Yuzvendra Chahal Statement on Rohit Sharma Captaincy : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या टी-२० सामन्यादरम्यान समालोचन (Commentary) करताना भारतीय लेग स्पिनर युझवेंद्र चहलने टीम इंडियाच्या बदललेल्या स्वरूपावर मोठे भाष्य केले आहे. माजी कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघात एक ‘क्रांतिकारी’ बदल झाला असून, संघ आता विकेट पडण्याची भीती न बाळगता खेळतो, असे चहलने स्पष्ट केले. २०२२ पूर्वीचा संघर्ष आणि रोहितचं नवं विजन – चहलच्या मते, २०२२ पूर्वी भारतीय संघाचा दृष्टिकोन वेगळा होता. विशेषतः ६ ते १५ या मधल्या षटकांमध्ये संघ अनेकदा आपली लय गमावत असे. यामुळे भारताची धावसंख्या अनेकदा १८० धावांच्या आसपासच मर्यादित राहत होती. मात्र, रोहित शर्माने कर्णधारपद स्वीकारताच ही मानसिकता बदलली. “आता आमचा संघ विकेट पडण्याची चिंता न करता सतत प्रहार करण्याच्या मानसिकतेने मैदानात उतरतो. मैदानावर असलेला प्रत्येक खेळाडू आता २००+ च्या स्ट्राईक रेटने खेळण्याचा प्रयत्न करतो,” असे चहलने सांगितले. “विकेट पडली तरी प्रहार थांबणार नाही!” युजवेंद्र चहलने रोहित शर्माच्या आक्रमक कर्णधारपदाचे कौतुक केले रोहित शर्माने दिलेल्या ‘निडर’ (Fearless) क्रिकेटच्या ब्रँडबद्दल बोलताना चहल म्हणाला की, “आता जर मधल्या फळीत विकेट्स पडल्या, तरीही आम्ही प्रतिहल्ला करणे थांबवत नाही.” रोहितने खेळाडूंना दिलेले मानसिक स्वातंत्र्य हेच भारताच्या यशाचे गमक असल्याचे चहलने नमूद केले. याच आक्रमक धोरणामुळे २०२४ मध्ये विराटकडून सलामी करून घेण्यासारखे धाडसी निर्णय यशस्वी ठरले आणि भारताने वर्ल्ड कप उंचावला. हेही वाचा – Nat Sciver Brunt Century : १०५७ दिवसांची प्रतीक्षा संपली! नॅट सायव्हर-ब्रंटने ठोकलं WPL इतिहासातील ‘पहिलं’ शतक सूर्याच्या नेतृत्वाखाली संघ अधिक घातक – रोहित शर्माने टी-२० क्रिकेटला निरोप दिल्यानंतर आता सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ हाच आक्रमक वारसा पुढे चालवत आहे. सूर्याच्या ‘ब्रिगेड’ने फलंदाजी अधिक स्फोटक बनवली असून, मोठ्या धावसंख्या उभारणे आता टीम इंडियासाठी सवयीचे झाले आहे. हीच आक्रमक शैली आगामी टी-२० वर्ल्ड कपमध्ये भारताला जेतेपद टिकवून ठेवण्यास मदत करेल का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.