Yuzvendra Chahal Vaping : मोठी बातमी! रियान परागनंतर आता युजवेंद्र चहल वादाच्या भोऱ्यात; विमानात ई-सिगारेट ओढतानाचा VIDEO व्हायरल
Yuzvendra Chahal Vaping : पंजाब किंग्सचा अनुभवी फिरकीपटू युझवेंद्र चहलचा एक खळबळजनक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Yuzvendra Chahal Vaping Video Viral : आयपीएल २०२६ मध्ये खेळाडूंच्या शिस्तीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान परागनंतर आता पंजाब किंग्सचा अनुभवी फिरकीपटू युझवेंद्र चहलचा एक खळबळजनक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये चहल चक्क विमानात प्रवास करताना ई-सिगारेट (Vape) ओढताना दिसत असून, यामुळे क्रिकेट वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
अर्शदीपच्या व्हिडिओमध्ये चहलचा कारनामा कैद –
हा प्रकार तेव्हा उघडकीस आला जेव्हा पंजाब किंग्सचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग विमानातील आपल्या सहकाऱ्यांशी गप्पा मारत असताना व्हिडीओ रेकॉर्ड करत होता. अर्शदीपच्या मागे बसलेल्या युझवेंद्र चहलला आपण कॅमेऱ्यात रेकॉर्ड होत आहोत याची पुसटशीही कल्पना नव्हती. याच ओघात तो ई-सिगारेट ओढताना कॅमेऱ्यात कैद झाला. ही चूक लक्षात येताच अर्शदीपने व्हिडिओ तातडीने हटवला, परंतु तोपर्यंत अनेक नेटकऱ्यांनी तो डाऊनलोड करून सोशल मीडियावर व्हायरल केला होता.
🚨SHOCKING | Cricketer Yuzvendra Chahal caught vaping inside a flight pic.twitter.com/HTlzVNQEDQ
— The Tatva (@thetatvaindia) May 7, 2026
नियमांचे उल्लंघन अन् कारवाईची टांगती तलवार –
🚨 YUZI CHAHAL FINED 🚨
Yuzi Chahal has been fined ₹1 lakh for vaping inside the flight. He has also received a strict warning from authorities.
That if such incident happens again, he could face up to 25 days jail sentence. pic.twitter.com/5bD9ewy3Zk
— Muftanal Wohra (@mufatnal_wohraa) May 7, 2026
विमानामध्ये धूम्रपान किंवा ई-सिगारेट ओढणे हा गंभीर गुन्हा मानला जातो. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या (DGCA) नियमांनुसार, विमानात ई-सिगारेट नेणे किंवा वापरणे यावर कडक बंदी आहे. कारण यामुळे आगीचा धोका निर्माण होऊन प्रवाशांचा जीव धोक्यात येऊ शकतो. आता या प्रकरणी अधिकृत तक्रार झाल्यास डीजीसीए चहलवर काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बीसीसीआय कडक पाऊल उचलणार?
काही दिवसांपूर्वीच रियान पराग ड्रेसिंग रूममध्ये ई-सिगारेट ओढताना आढळला होता, ज्यावर बीसीसीआयने (BCCI) त्याच्या मॅच फीमध्ये २५ टक्क्यांची कपात करून त्याला एक डिमेरिट पॉईंट दिला होता. तसेच इतर खेळाडूंनाही कडक ताकीद देण्यात आली होती. आता चहलने चक्क विमानात ही चूक केल्यामुळे बीसीसीआय त्याच्यावर मोठी दंडात्मक कारवाई किंवा बंदी घालण्याची शक्यता नाकारता येत नाही





