Yuzvendra Chahal Controversy : युझवेंद्र चहल वादाच्या भोवऱ्यात! चालत्या कारमधून सिगारेट ओढून रस्त्यावर फेकल्याने चाहत संतप्त, पाहा VIDEO
Yuzvendra Chahal Controversy : युझवेंद्र चहलसारखा दिसणारा एक व्यक्ती चालत्या कारमधून सिगरेट ओढून ती रस्त्यावर फेकत असल्याचा दावा केला जात आहे.

Yuzvendra Chahal cigarette Smoking Controversy : भारतीय फिरकीपटू युझवेंद्र चहल सध्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत असून, त्यात चहलसारखा दिसणारा एक व्यक्ती चालत्या कारमधून सिगारेट ओढून ती रस्त्यावर फेकत असल्याचा दावा केला जात आहे. आयपीएल २०२६ चा हंगाम सुरू असतानाच या वादाने डोकं वर काढलं आहे.
१० एप्रिल २०२६ रोजी सोशल मीडियावर काही व्हिडीओ समोर आले आहेत, ज्यामध्ये एक व्यक्ती आलिशान कार चालवत असताना सिगारेट ओढताना दिसत आहे आणि त्यानंतर ती सिगारेट रस्त्यावर फेकताना दिसत आहे. हा व्यक्ती युझवेंद्र चहल असल्याचा दावा अनेक युजर्सनी केला असून त्याच्या ‘नागरी शिस्ती’वर (Civic Sense) प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
व्हिडिओची सत्यता काय?
While driving on the highway, Yuzi Chahal threw a cigarette onto the road.
Even cricketers have zero civic sense. pic.twitter.com/JuWwJyCrmQ
— Aditya (@Warlock_Aditya) April 10, 2026
हा व्हिडीओ नेमका कधीचा आणि कुठला आहे, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. व्हिडिओमध्ये दिसणारा चेहरा चहलशी मिळताजुळता असला, तरी तो स्वतः चहलच आहे का, याची पुष्टी झालेली नाही. या प्रकरणावर अद्याप युझवेंद्र चहल किंवा त्याच्या पंजाब किंग्स या फ्रँचायझीकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. विशेष म्हणजे चहल सध्या आयपीएल २०२६ मध्ये पंजाब किंग्सकडून खेळत आहे.
टीम इंडियातील पुनरागमन कठीण?
🚨 युजवेंद्र चहल को चंडीगढ़ में गाड़ी चलाते समय जलती हुई सिगरेट फेंकते हुए देखा गया। 👀
लेकिन सबसे अहम सवाल यह है कि क्या चलती गाड़ी में जलती हुई सिगरेट सड़क पर फेंकना जायज़ है? pic.twitter.com/9IWMbMi467
— ममता ट्राबल (@Mamtasulaniya) April 10, 2026
युझवेंद्र चहल गेल्या दोन वर्षांपासून भारतीय संघाबाहेर आहे. त्याने आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना ऑगस्ट २०२३ मध्ये खेळला होता. ३५ वर्षांच्या चहलसाठी आधीच संघात पुनरागमन करण्याचे मोठे आव्हान असताना, अशा प्रकारचे वाद त्याच्या अडचणीत वाढ करू शकतात. सोशल मीडियावर चाहते या कृत्याचा निषेध करत असून, खेळाडूंनी जबाबदारीने वागले पाहिजे, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.





