Yuzvendra Dhanashree Divorce Confirm : युजवेंद्र आणि धनश्रीच्या घटस्फोटावर कोर्टाकडून शिक्कामोर्तब! किती मिळणार पोटगी?

Yuzvendra Chahal and Dhanashree Verma Divorce Confirm : भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी लेग स्पिनर युजवेंद्र चहल आणि कोरिओग्राफर धनश्री वर्मा यांच्या घटस्फोटावर आज शिक्कामोर्तब झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वांद्रे कुटुंब न्यायालयात हा निर्णय देण्यात आला आहे. युजवेंद्र चहल यांचे वकील नितीन कुमार गुप्ता यांनी घटस्फोटाची पुष्टी केली आहे. त्यांनी त्यांच्या निवेदनात स्पष्टपणे म्हटले आहे की चहल आणि धनश्री घटस्फोटित आहेत. युजवेंद्र चहल धनश्री वर्माला पोटगी म्हणून ४.७५ कोटी रुपये देणार असल्याच्या बातम्या आहेत.
मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी वांद्रे कुटुंब न्यायालयाला क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांच्या घटस्फोटाच्या अर्जावर गुरुवारपर्यंत निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार घटस्फोटासाठी अर्ज केल्यानंतर कायदेशीररित्या अनिवार्य असलेल्या सहा महिन्यांचा कूलिंग ऑफ पीरियड माफ करुन घटस्फोटावर शिक्कामोर्तब केला. न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या एकल खंडपीठाने सांगितले की, चहल २१ मार्चपासून उपलब्ध राहणार नाही.
कारण त्याला आयपीएल २०२५ मध्ये सहभागी होणार आहे. युजवेंद्र आणि धनश्री यांनी यावर्षी ५ फेब्रुवारी रोजी येथील कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. चहल आणि धनश्री यांनी परस्पर संमतीने घटस्फोट मागितला असल्याने कायदेशीररित्या अनिवार्य सहा महिन्यांचा कालावधी माफ करण्याची विनंती करणारी याचिका दाखल केली होती.
#WATCH | Mumbai: On the divorce of Cricketer Yuzvendra Chahal and Dhanashree Verma, Advocate Nitin Kumar Gupta, representing Chahal, says, "The court has granted the decree of divorce. The court has accepted the joint petition of both parties. The parties are no longer husband… pic.twitter.com/LV1BpFwxIN
— ANI (@ANI) March 20, 2025
२०२० मध्ये दोघांनी केले होते लग्न –
युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांचे लग्न २२ डिसेंबर २०२० रोजी झाले होते. हा प्रेमविवाह होता. चहलने झलक दिखला जा या डान्स शोमध्ये त्याची प्रेमकहाणी सांगितली होती. कोरोना महामारीच्या काळात लॉकडाऊन दरम्यान नृत्य करण्यासाठी धनश्री वर्माशी कसा संपर्क साधला होता हे त्यांनी सांगितले होते. धनश्रीने चहलला नृत्य शिकवण्यास होकार दिला होता. यानंतर दोघांमधील मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि त्यांचे लग्न झाले.
इतक्या रकमेमध्ये झाली सेटलमेंट –
युजवेंद्र आणि धनश्री यांच्यात ४.७५ कोटी रुपयांत पोटगीचा समझोता झाला आहे. आधी अशी अफवा होती की चहल पोटगी म्हणून ६ कोटी रुपये देईल. धनश्री आणि चहल यांच्यात घटस्फोटाच्या अफवा बऱ्याच काळापासून होत्या. दोघेही डान्सच्या माध्यमातून एकत्र आले होते. चहल आणि धनश्रीच्या घटस्फोटाच्या अफवा सुरु होत्या होत्या, त्यावेळी युजवेंद्र चहल आरजे महवशसोबत चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामना पाहण्यासाठी गेला होता, ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.





