इंदोर – ससुराल सिमर का, ये रिश्ता क्या कहलाता है या छोट्या पडद्यावरील मालिकांमुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री वैशाली ठक्कर तिच्या इंदोर येथील घरात मृतावस्थेत आढळून आली आहे. तिने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. वैशाली 26 वर्षांची होती. इंदोर येथे ती तिचे वडिल आणि भावासोबत राहत होती व आत्महत्या करण्यापूर्वी तिने लिहिलेली चिठ्ठीही पोलिसांना मिळाली आहे.
2015 मध्ये तिने ये रिश्ता या मालिकेद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. अलिकडेच प्रदर्शित झालेल्या रक्षा बंधन या चित्रपटातही तिची भूमिका होती. आज सकाळी तिने तिच्या खोलीचे दार न उघडल्याने तिच्या वडिलांनी दार उघडल्यावर ती गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. गेल्या काही काळापासून ती तणावात होती व तिचा पूर्वाश्रमीचा प्रियकर छळवणूक करत होता अशी माहिती पुढे आली आहे.