IND vs ENG : अखेर टीम इंडियाने विजयाचा दुष्काळ संपवला! एजबेस्टनमध्ये १२ वर्षांनी इंग्लंडचा माज उतरवला; अक्षर-शुबमन ठरले गेमचेंजर
IND vs ENG : यासह यजमान इंग्लंडला १२ वर्षांनंतर पहिल्यांदाच एजबेस्टनवर पराभव पत्करावा लागला आहे.

IND vs ENG 1st ODI India beat England by 6 Wickets Edgbaston : टीम इंडियाची सलग पराभवांची नकोशी मालिका अखेर संपुष्टात आली आहे. आयर्लंडविरुद्धचे दोन आणि इंग्लंडविरुद्धचे चार टी-२० सामने गमावल्यानंतर टीम इंडियाला पहिला विजय मिळाला आहे. एजबेस्टन येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या वनडे सामन्यात भारताने यजमान इंग्लंडचा ६ गडी राखून पराभव केला. यासह यजमान इंग्लंडला १२ वर्षांनंतर पहिल्यांदाच एजबेस्टनवर पराभव पत्करावा लागला आहे.
इंग्लंडने दिलेल्या २५९ धावांच्या लक्षाचा पाठलाग करताना भारताने ४ गड्यांच्या मोबदल्यात हे लक्ष्य सहज गाठले. भारताच्या या विजयाचे शिल्पकार कर्णधार शुभमन गिल आणि अष्टपैलू अक्षर पटेल ठरले. गिलने ८० धावांची खेळी केली, तर अक्षरने अष्टपैलू चमक दाखवत ४ विकेट्स घेण्यासोबतच स्फोटक अर्धशतक ठोकले. वॉशिंग्टन सुंदरनेही नाबाद अर्धशतक झळकावून विजयावर शिक्कामोर्तब केले.
एजबेस्टनमध्ये १२ वर्षांनंतर इंग्लंडचा पराभव –
Job completely done in style ✅#TeamIndia cruise to a 6️⃣-wicket victory to take a 1-0 lead in the ODI series 💙
Scorecard ▶️ https://t.co/2sg194tpxH #TeamIndia | #ENGvIND pic.twitter.com/PnUDkcVLyr
— BCCI (@BCCI) July 14, 2026
बर्मिंघमच्या एजबेस्टन मैदानावर इंग्लंडचा एकहाती दबदबा होता. या मैदानावर यजमान संघ गेल्या १२ वर्षांपासून एकही वनडे सामना हरला नव्हता. २०१४ मध्ये भारतानेच त्यांना येथे शेवटचे पराभूत केले होते. त्यानंतर आता २०२६ मध्ये पुन्हा एकदा भारतानेच इंग्लंडचा हा बालेकिल्ला उद्ध्वस्त केला आहे. या मैदानावर सलग सात वनडे सामने जिंकल्यानंतर इंग्लंडला पराभवाचा चव चाखावी लागली आहे.
१०७ वर ६ विकेट्स; रूट-डॉसनने सावरले –
Captain Shubman Gill is retired hurt on 80 runs.#ENGvIND pic.twitter.com/zK4oCKZ3Gu
— BCCI (@BCCI) July 14, 2026
इंग्लंडने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो त्यांच्या अंगाशी आला. जसप्रीत बुमराह आणि प्रसिद्ध कृष्णा यांच्या नियंत्रित गोलंदाजीमुळे इंग्रजांना मोकळेपणाने खेळता आले नाही. बेन डकेटने आक्रमक ४३ धावा केल्या, पण गुरनूर बरारने एकाच षटकात डकेट आणि जेकब बेथेल (१४) यांना बाद करून भारताला मोठे यश मिळवून दिले. यानंतर इंग्लंडची मधली फळी पत्त्यांसारखी कोसळली. कर्णधार हॅरी ब्रुक १, जोस बटलर ५ आणि सॅम करन शून्य धावांवर बाद झाले. १०७ धावांवर ६ विकेट्स पडल्यानंतर जो रूट (नाबाद ७६) आणि लियाम डॉसन (६८) यांनी शतकी भागीदारी करत इंग्लंडला २५८ धावांपर्यंत पोहोचवले.
रोहित-विराट फ्लॉप; अक्षर-सुंदरने मॅच जिंकवली!
A truly flawless all-round performance 🌟
Axar Patel bags the well-deserved POTM award for his 4️⃣-wicket haul and vital half-century 🔥
Scorecard ▶️ https://t.co/2sg194tpxH #TeamIndia | #ENGvIND | @akshar2026 pic.twitter.com/eSGYHXzXll
— BCCI (@BCCI) July 14, 2026
भारताची सुरुवातही अत्यंत खराब झाली. रोहित शर्मा ११ आणि विराट कोहली अवघ्या ५ धावांवर बाद झाले. मात्र, शुबमन गिलने शानदार फटकेबाजी करत ८० धावा कुटल्या, पण दुखापतीमुळे त्याला मैदानाबाहेर जावे लागले. श्रेयस अय्यर ३५ धावांवर धावबाद झाला आणि केएल राहुल १ धावेवर बाद झाल्याने भारत अडचणीत आला. अशा वेळी अक्षर पटेलने अवघ्या ३८ चेंडूंत वादळी अर्धशतक ठोकले आणि वॉशिंग्टन सुंदरने ६३ चेंडूंत नाबाद ५२ धावांची खेळी करत भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला.





