Wide Ball Drama : शेवटच्या ३ चेंडूंत ५ धावांची गरज असताना वाईड बॉलवरुन राडा! श्रेयस अन् अक्षर थेट अंपायरशी भिडले, पाहा VIDEO
Wide Ball Drama : अखेरच्या ३ चेंडूंवर जपानला विजयासाठी ५ धावांची आवश्यकता असताना मैदानात हायव्होल्टेज ड्रामा रंगला, नेमकं काय घडलं? जाणून घेऊया.

India Beat Japan By 2 Runs In Suzuki Cup Thriller Umpire Wide Decision Drama Sano : भारत आणि जपान यांच्यातील ऐतिहासिक आंतरराष्ट्रीय टी-२० सामना सानो इंटरनॅशनल क्रिकेट ग्राउंडवर अत्यंत रोमहर्षक आणि वादग्रस्त वळणावर संपला. पावसाच्या व्यत्ययामुळे प्रत्येकी ५-५ षटकांच्या करण्यात आलेल्या या सामन्यात भारतीय संघाने अवघ्या २ धावांनी निसटता विजय नोंदवत सुझुकी कपवर (Suzuki Cup) आपले नाव कोरले. मात्र, अखेरच्या ३ चेंडूंवर जपानला विजयासाठी ५ धावांची आवश्यकता असताना मैदानात हायव्होल्टेज ड्रामा रंगला, ज्यामुळे सामन्याचे वातावरण चांगलेच तापले होते.
भारताच्या अवघ्या ३२ धावा; अखेरच्या षटकात जपानला विजयाची संधी!
प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघ ५ षटकांत ४ बाद ३२ धावांपर्यंतच मजल मारू शकला. या छोट्या आव्हानाचा पाठलाग करताना जपानला शेवटच्या ६ चेंडूंमध्ये विजयासाठी ८ धावांची गरज होती आणि त्यांच्या हातात ७ विकेट्स शिल्लक होत्या. कर्णधार श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) निर्णायक षटकाची जबाबदारी अनुभवी फिरकीपटू अक्षर पटेलकडे सोपवली. पहिल्या निर्धाव चेंडूनंतर दुसऱ्या चेंडूवर धाव आली, तर तिसरा चेंडू वाईड पडल्याने जपानच्या आशा पल्लवित झाल्या होत्या.
रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न अन् वाईडचा वाद; अंपायरशी भिडले भारतीय खेळाडू!
Last Over Drama in Sano.!!!
– Japan needed 8 runs in 6 balls to create a history, However Axar Patel kept his nerves and avoided an embarrassing situation for India. pic.twitter.com/jevMe4sIev
— Kashif (@KashifNdmCric) September 22, 2026
तिसरा चेंडू पुन्हा टाकला असता जपानी फलंदाजाने रिव्हर्स स्वीप खेळण्याचा पवित्रा घेतला. चेंडू वाईडच्या रेषेपलीकडून गेल्याने मैदानावरील पंचांनी तात्काळ हात पसरवून वाईडचा इशारा दिला. हा निर्णय पाहताच कर्णधार श्रेयस अय्यर, यष्टिरक्षक संजू सॅमसन (Sanju Samson) आणि गोलंदाज अक्षर पटेल (Axar Patel) अत्यंत संतप्त झाले आणि त्यांनी पंचांना फलंदाजाची मूळ पोझिशन दाखवत जाब विचारला. खेळाडूंच्या तीव्र आक्षेपानंतर पंचांनी आपली चूक मान्य करत वाईडचा निर्णय मागे घेतला.
पंचांनी निर्णय बदलला नसता तर…; अखेर भारताचा थरारक विजय!
जर पंचांनी तो वाईड कायम ठेवला असता, तर जपानला १ अतिरिक्त धाव आणि आणखी एक चेंडू मिळाला असता, ज्यामुळे सामन्याचा निकाल उलटण्याची दाट शक्यता होती. मात्र, निर्णय बदलल्याने अक्षरने पुढील तीन चेंडूंत केवळ एकेक धाव देत जपानला ५ बाद ३० धावांवर रोखले. भारताने अवघ्या २ धावांनी हा सामना जिंकला असला, तरी पंचांच्या त्या वादग्रस्त निर्णयाची जगभरात चर्चा रंगली आहे.





