WPL 2026 Retention List : मेगा ऑक्शनपूर्वी बिग ब्रेक! कोणत्या संघाने कोणाला केले रिटेन? पाहा संपूर्ण यादी

WPL 2026 Retention List Updates : महिला प्रीमियर लीग (डब्ल्यूपीएल) २०२६ च्या मेगा ऑक्शनपूर्वी सर्व पाच फ्रेंचायझींनी आपल्या रिटेंशन लिस्ट जाहीर केल्या आहेत. यंदा अनेक मोठ्या नावांना संघांनी रिलीज करून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. यात भारताची स्टार ऑलराउंडर दीप्ति शर्मा, दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वोल्वार्ड्ट, ऑस्ट्रेलियाची अनुभवी कर्णधार मेग लॅनिंग आणि विकेटकीपर एलिसा हीली यांचा समावेश आहे. मात्र, भारताच्या विश्वचषक विजेत्या संघाच्या कर्णधार हरमनप्रीत कौर, स्मृती मानधना, शफाली वर्मा आणि जेमिमा रोड्रिग्स यांना त्यांच्या संघांनी रिटेन करून विश्वास दाखवला आहे.
गुजरात जायंट्सची रणनीती: वोल्वार्ड्ट रिलीज, मूनी-गार्डनर रिटेन
गुजरात जायंट्सने दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वोल्वार्ड्टला रिटेन केले नाही. नियमांनुसार फक्त दोन विदेशी खेळाडूंनाच रिटेन करता येते, त्यामुळे संघाने ऑस्ट्रेलियाची जोडी बेथ मूनी (२.५ कोटी रुपये) आणि अॅशले गार्डनर (३.५ कोटी रुपये) यांना आपल्याकडे कायम ठेवले आहे.
यूपी वॉरियर्सची नवीन सुरुवात: फक्त श्वेता सेहरावत रिटेन
The retentions are here 🙌
A look at the retained players of all 5️⃣ teams ahead of the #TATAWPL Mega Auction👌@DelhiCapitals | @Giant_Cricket | @mipaltan | @RCBTweets | @UPWarriorz pic.twitter.com/CFCUewLVPJ
— Women’s Premier League (WPL) (@wplt20) November 6, 2025
यूपी वॉरियर्सने यंदा नव्याने सुरुवात करण्याचे संकेत दिले आहेत. संघाने केवळ अंडर-१९ विश्वचषक विजेती श्वेता सेहरावतला (५० लाख रुपये) रिटेन केले असून, उर्वरित सर्व मोठी नावे दीप्ति शर्मा, एलिसा हीली, सोफी एक्लेस्टोन आणि क्रांति गौड यांसारख्या खेळाडूंना रिलीज केले आहे.
मुंबई इंडियन्सचा मजबूत कोअर कायम –
मुंबई इंडियन्सने आपल्या पाच खेळाडूंना रिटेन केले आहे. यात नॅट सिव्हर-ब्रंट (३.५ कोटी रुपये), हरमनप्रीत कौर (२.५ कोटी रुपये), हेली मॅथ्यूज (१.७५ कोटी रुपये), अमनजोत कौर (१ कोटी रुपये) आणि जी. कमलिनी (५० लाख रुपये) यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, नॅट सिव्हर-ब्रंटला कर्णधार हरमनप्रीतपेक्षा जास्त किंमतीत रिटेन करण्यात आले आहे. अमेलिया केर, पूजा वस्त्राकर आणि यास्तिका भाटिया यांसारख्या खेळाडूंना मात्र रिलीज करण्यात आले आहे.
दिल्ली कॅपिटल्सचा धक्कादायक निर्णय: मेग लॅनिंग रिलीज
तीन सलग फायनल खेळूनही दिल्ली कॅपिटल्सने आपली कर्णधार मेग लॅनिंगला रिलीज केले आहे. संघाने जेमिमा रोड्रिग्स (२.२ कोटी रुपये), शफाली वर्मा (२.२ कोटी रुपये), अॅनाबेल सदरलँड (२.२ कोटी रुपये), मारिझॅन कॅप (२.२ कोटी रुपये) आणि निकी प्रसाद (५० लाख) यांना रिटेन केले आहे.
हेही वाचा – Mumbai Indians : मुंबई इंडियन्सची रिटेंशन लिस्ट जाहीर! कर्णधारासह ‘या’ पाच खेळाडूंना केले रिटेन
आरसीबीचे मंधाना-ऋचा यांच्यावर दाखवला विश्वास
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने चार खेळाडूंना रिटेन केले आहे. यात कर्णधार स्मृती मानधना (३.५ कोटी रुपये), ऋचा घोष (२.७५ कोटी रुपये), एलिस पेरी (२ कोटी रुपये) आणि श्रेयंका पाटील (६० लाख रुपये) यांचा समावेश आहे. सोफी मोलिन्यू, रेणुका ठाकुर, स्नेह राणा आणि डॅनी व्याट-हॉज यांसारख्या मोठ्या नावांना मात्र संघाने रिलीज केले आहे.





