Kiran Navgire WPL : सोलापूरकर बिग हिटर किरण नवगिरेवर मोठी बोली! मुंबई-दिल्लीत झुंज, अखेर ‘या’ संघाने मारली बाजी
Kiran Navgire WPL : किरण नवगिरे हिला आपल्या संघात घेण्यासाठी मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये चढाओढ पाहायला मिळाली.

WPL 2027 Auction Kiran Navgire Sold to Delhi Capitals for 75 Lakhs : महिला प्रीमियर लीग २०२७ (WPL 2027) च्या मिनी लिलावात सोलापूरची आक्रमक फलंदाज किरण नवगिरे हिच्यावर अपेक्षेप्रमाणे जोरदार बोली लागली. तिला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी मुंबई इंडियन्स (MI) आणि दिल्ली कॅपिटल्स (DC) यांच्यात जबरदस्त चुरस पाहायला मिळाली. अवघ्या ९० लाख रुपयांच्या पर्ससह उतरलेल्या मुंबईने किरणसाठी तब्बल ७० लाखांपर्यंत बोली लावत मोठा धोका पत्करला. मात्र, अखेर दिल्ली कॅपिटल्सने ७५ लाख रुपयांची अंतिम बोली लावत बाजी मारली आणि या स्फोटक बॅटरला आपल्या संघात समाविष्ट केले.
४० लाखांच्या बेस प्राईसवरून रंगली चुरस –
किरण नवगिरे यापूर्वी युपी वॉरियर्स संघाचे प्रतिनिधित्व करत होती; मात्र तिथे तिला सातत्य दाखवता आले नव्हते. तरीही तिच्यातील आक्रमक फटकेबाजी आणि सामना एकहाती फिरवण्याची क्षमता ओळखून फ्रँचायझींमध्ये तिला घेण्यासाठी उत्सुकता होती. ती ४० लाखांच्या मूळ किमतीसह लिलावात उतरली असता मुंबई इंडियन्सने तिच्यावर पहिली बोली लावली. त्यानंतर दिल्लीने तात्काळ पॅडल उचलत चढाओढ सुरू केली, ज्यामुळे तिची किंमत वेगाने वाढत गेली.
Kiran Navgire is set to bring her power-hitting abilities to @DelhiCapitals 💙
🎥 RELIVE the first bid of #TATAWPLAuction 2027 🔨
#TATAWPL https://t.co/8gQzUo4mCN
— Women’s Premier League (WPL) (@wplt20) October 28, 2026
९० लाखांच्या पर्समधील ७० लाख पणाला; मुंबईचा धाडसी निर्णय
“One of the hardest hitters…” 💪💥
Coach JB had Kiran in his plans & now she’s a Tigress 💙❤️ https://t.co/JJgJZU9HfJ
— Delhi Capitals (@DelhiCapitals) October 28, 2026
मुंबई इंडियन्सने लिलावापूर्वीच आपले अनेक महत्त्वाचे खेळाडू रिटेन केले असल्याने त्यांच्या पर्समध्ये सर्वात कमी म्हणजे अवघे ९० लाख रुपये शिल्लक होते. असे असतानाही त्यांनी आपल्या एकूण बजेटमधील तब्बल ७० लाख रुपये एकट्या किरण नवगिरेवर खर्च करण्याची प्रचंड हिंमत दाखवली. मुंबईच्या या आक्रमक पवित्र्याने लिलावाच्या सभागृहातील सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या आणि हा डाव चर्चेचा केंद्रबिंदू ठरला.
अखेर कमी बजेटमुळे मुंबईची माघार; दिल्लीने मारली बाजी –
A new jersey, the same explosive intent! 🔥🏏
Kiran Navgire opens up about joining Delhi Capitals for ₹75 lakh and embracing the exciting journey ahead! 🎙️🙌
#TATAWPL Auction 2027 | LIVE NOW 👉 https://t.co/BdYCUqBKAA https://t.co/LoKUGGUfkS
— Star Sports (@StarSportsIndia) October 28, 2026
बोली ७० लाखांवर पोहोचल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सने ७५ लाखांचा आकडा गाठला. मुंबईकडे केवळ ९० लाख रुपये शिल्लक असल्याने उर्वरित खेळाडूंचा विचार करता त्यांना नाईलाजाने माघार घ्यावी लागली. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्सने ७५ लाखांत किरण नवगिरेला आपल्या संघात खेचले. आगामी हंगामात दिल्लीच्या संघातून किरणच्या वादळी फलंदाजीचा थरार पाहण्यासाठी क्रिकेट चाहते आता आतुर झाले आहेत.





