WPL Auction Squads : मिनी लिलावात युपी वॉरियर्सचा डंका! सोफी मोलिन्यू ठरली सर्वात महागडी खेळाडू, पाहा पाचही संघांचे संपूर्ण स्क्वॉड
WPL Auction Squads : युपी वॉरियर्सने मोलिन्यू आणि स्नेह राणाला घेऊन बाजी मारली आहे, तर आरसीबी आणि दिल्लीने आपल्या उणिवा भरून काढल्या आहेत.

WPL 2027 Mini Auction Highlights and Complete Team Squads : महिला प्रीमियर लीग २०२७ (WPL 2027) चा मिनी लिलाव अत्यंत उत्साहात पार पडला आहे. ऑस्ट्रेलियन महिला संघाला विश्वचषक जिंकून देणारी स्टार कर्णधार सोफी मोलिन्यू या लिलावात सर्वात महागडी खेळाडू ठरली. ५० लाख रुपयांच्या बेस प्राईसवर असलेल्या सोफीला युपी वॉरियर्स (UP Warriorz) संघाने तब्बल १.१ कोटी रुपये मोजून आपल्या ताफ्यात दाखल केले. आरसीबीनेही तिच्यावर मोठा डाव लावला होता, मात्र अखेर युपीने बाजी मारली. युपीसाठी हा लिलाव अत्यंत यशस्वी ठरला असून त्यांनी स्नेह राणा आणि ग्रेस हॅरिस यांना बेस प्राईसवर खरेदी करून संघ आणखी मजबूत केला.
१. युपी वॉरियर्सची सर्वोत्तम रणनीती; सोफी ठरली सर्वात महागडी –
युपी वॉरियर्सची टीम सर्वात मोठ्या पर्ससह मैदानात उतरली होती. लिलावातील सर्वात मोठी १.१ कोटींची बोली लावत त्यांनी सोफी मोलिन्यूला संघात घेतले. याशिवाय अनुभवी ग्रेस हॅरिस आणि स्नेह राणा यांना प्रत्येकी ३० लाखांच्या बेस प्राईसवर खरेदी करत संघाने मधली फळी भक्कम केली. अनेक उदयोन्मुख युवा खेळाडूंना जोडून युपीने सर्वसमावेशक संघ बांधला आहे.
𝐓𝐡𝐞 𝐭𝐨𝐩 𝐛𝐮𝐲 𝐨𝐟 𝐭𝐡𝐞 #TATAWPLAuction 𝟐𝟎𝟐𝟕 👏
@UPWarriorz fans, how thrilled are you to welcome the Australian skipper to your side for the upcoming season? 💜
#TATAWPL https://t.co/41gWpkP9aR
— Women’s Premier League (WPL) (@wplt20) October 28, 2026
२. आरसीबीची अखेरच्या फेरीत खरेदी; जेस जॉन्सन आणि तेजल संघात
आरसीबी विमेन्स संघ १.१५ कोटी रुपयांची पर्स घेऊन उतरला होता. त्यांनी सुरुवातीला सोफी मोलिन्यूसाठी आक्रमक बोली लावली, पण अपयश आले. त्यानंतर अॅक्सिलरेटेड फेरीपर्यंत त्यांनी एकही खरेदी केली नाही. अखेरच्या टप्प्यात त्यांनी भारताची नवोदित फलंदाज तेजल हसबनीस आणि ऑस्ट्रेलियाची अनुभवी अष्टपैलू जेस जॉन्सन यांच्यावर यशस्वी बोली लावून आपला संघ संतुलित केला.
३. गुजरात जायंट्सचा हुशार डाव; ओरला आणि कमालिनीवर दाखला विश्वास
https://t.co/ODmLGGAwPf
— Women’s Premier League (WPL) (@wplt20) October 28, 2026
गुजरात जायंट्सने या लिलावात कोणतीही अवास्तव मोठी बोली लावली नाही. त्यांनी भारताची युवा यष्टिरक्षक फलंदाज जी. कमालिनी हिला ४० लाखांच्या मूळ किमतीत आपल्या गोटात खेचले, जी बेथ मुनीसाठी उत्तम बॅकअप ठरू शकते. याशिवाय आयर्लंडची प्रतिभावान अष्टपैलू खेळाडू ओरला प्रेंडरगास्ट हिला संघात समाविष्ट करून त्यांनी आपली ताकद वाढवली आहे.
४. दिल्ली कॅपिटल्सचा किरण नवगिरेवर ७५ लाखांचा मोठा जुगार
दिल्ली कॅपिटल्सने महाराष्ट्राच्या आक्रमक फलंदाज किरण नवगिरेवर तब्बल ७५ लाख रुपये खर्च करून सर्वांना चकित केले; कारण स्नेह राणासारखी अनुभवी खेळाडू अवघ्या ३० लाखांत विकली गेली होती. तरीही आधीच स्टार खेळाडूंचा भरणा असलेल्या दिल्लीने काश्वी कंडीकुप्पा आणि नजमा खान यांसारख्या खेळाडूंना जोडून संतुलन साधले आहे.
५. मुंबई इंडियन्सने खरेदी केले फक्त ३ खेळाडू –
From WPL Speed Queen to the Mumbai Indians squad 💙
🎥 Relive the moment Akshita Bhagat was sold to @mipaltan for INR 10 Lakh at the #TATAWPLAuction 2027 👏
#TATAWPL https://t.co/ksk0eX9w5J
— Women’s Premier League (WPL) (@wplt20) October 28, 2026
मुंबईच्या संघात आधीच ८-९ खेळाडू निश्चित आहेत. या लिलावात त्यांचे बजेट सर्वात कमी होते आणि त्यांना काही निवडक जागा भरण्यासाठी खेळाडूंची गरज होती. त्यामुळे, संघाने सुरुवातीला प्रत्येकी १० लाख रुपयांच्या मूळ किमतीत तीन तरुण भारतीय खेळाडूंना संघात घेतले. किशा कसात, लतिका इनामदार आणि भारती रावल यांना संघात घेऊन संघाने आपली स्थिती लक्षणीयरीत्या मजबूत केली.





