Syed Modi International 2024 : सिंधू पाठोपाठ लक्ष्य सेनची उपांत्यपूर्व फेरीत धडक

Syed Modi International 2024 : दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती पी.व्ही. सिंधू आणि पॅरिस 2024 स्पर्धेतील उपांत्य फेरीतील स्पर्धक लक्ष्य सेन यांनी गुरुवारी लखनौमध्ये सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय 2024 बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व (QUARTER FINAL) फेरीत प्रवेश केला. दोघांनी आपापले सामने वेगवेगळ्या शैलीत जिंकले.
सिंधूने पहिल्या फेरीत अनमोल खरब हिचा पराभव करून दुसऱ्या फेरीत भारताच्याच इरा शर्माविरुद्ध संघर्षमय विजय नोंदवला. 49 मिनिटे चाललेल्या या सामन्यात सिंधूने 21-10, 12-21, 21-15 असा विजय मिळवला.
Lakshya Sen seals a comfortable victory in his 2nd round match in #SyedModiInternational 2024.
Read: https://t.co/FbR8PPTrzA | #Badminton pic.twitter.com/rODcfW029y
— Sportstar (@sportstarweb) November 28, 2024
तर दुसरीकडे पुरूष एकेरीत लक्ष्य सेनने इस्रायलच्या डॅनियल डुबोव्हेंकोचा 21-14, 21-13 असा सहज पराभव केला. आता त्याचा पुढील सामना भारताच्या मिराबा लुवांग मैस्नामशी होणार आहे. मिराबा लुवांग मैस्नाम याने नहात गुयेन (आयर्लंड)चा 21-15,21-13 असा पराभव करत आगेकूच केली आहे.
Syed Modi International 2024 : पी.व्ही सिंधूची उपांत्यपूर्व फेरीत धडक…
अन्य लढतीत भारताच्या आयुष शेट्टीने हो जस्टिन (मलेशिया)चा 21-12, 21-19 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. त्याचा पुढील फेरीतील सामना जपानच्या शोगो ओगावाविरूध्द असेल. दरम्यान, शोगो ओगावा (जपान) याने भारताच्या किरण जॉर्जचा 19-21, 22-20, 21-11 असा पराभव करत पुढे आगेकूच केली आहे.





