Ladki Bahin Yojana : राज्याचा २०२६-२७ वर्षाचा अर्थसंकल्प ६ मार्च रोजी विधानसभेत सादर केला जाणार आहे. या अर्थसंकल्पाकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात कोणत्या नवीन घोषणा करण्यात येणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. महायुती सरकारची महत्वकांशी योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत मोठी घोषणा अर्थसंकल्पात केली जाऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. सध्या या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जातात. ही रक्कम २१०० रुपये केली जाऊ शकते. गेल्या अधिवेशनात देखील विरोधकांनी महिला व बालकल्याण मंत्री आदित्य तटकरे यांना या प्रश्नावरुन घेराव घातला होता. सरकारने १५०० रुपये ही रक्कम वाढवून २१०० रुपये करणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र, अद्यापर्यंत याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात तरी ही रक्कम वाढवून दिली जाणार का याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. राज्याचा २०२६-२७ वर्षाचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेत सादर करणार आहेत. तर विधानपरिषदेत अर्थराज्यमंत्री आशिष जयस्वाल हे अर्थसंकल्प सादर करतील. लाडकी बहीण योजनेत मागच्या वर्षी ३६ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी हा निधी वापरण्यात येणार होता. त्यानंतर आता पुढच्या २०२६-२७ साठी निधीची घोषणा केली जाणार आहे. ladki bahin yojana आणखी कोणती मोठी घोषणा केली जाऊ शकते? अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर यंदाचा अर्थसंकल्प राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पात अनेक मोठ्या घोषणा केल्या जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, याबाबत अधिकृत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीसंदर्भात निर्णय घेतले जाऊ शकतो. यासोबतच लाडकी बहीण योजनेसंदर्भात काय निर्णय होणार याकडे लक्ष असणार आहे. हेही वाचा : Vadgaon Maval : मावळात धूलिवंदन उत्साहात; पारंपारिक रिती-रिवाजांनुसार रंगांची मुक्त उधळण