Devendra Fadnavis : 2029 पूर्वीच फडणवीस पंतप्रधान होणार?; बड्या नेत्याच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
Devendra Fadnavis :

Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भाजपच्या संसदीय मंडळात पुन्हा निवड झाल्यानंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी फडणवीस यांच्या पंतप्रधानपदाच्या संभाव्यतेवर मोठं वक्तव्य केलं आहे. “आमची इच्छा आहे की देवेंद्र फडणवीस यांनी 2029 पूर्वी पंतप्रधान व्हावं. कारण 2029 नंतर तर त्यांना काही संधी नाही. एकदातरी मराठी माणूस पंतप्रधान व्हावा,” असं वडेट्टीवार म्हणाले. (Devendra Fadnavis)
भाजप फडणवीसांना पुढे नेणार की…
वडेट्टीवार म्हणाले की, देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले आहेत. त्यामुळे त्यांची भाजपच्या वरिष्ठ समितीत नियुक्ती झाली असावी. भाजपने कोणाला कुठे जबाबदारी द्यायची हा त्यांचा अंतर्गत विषय आहे. मात्र, 2029 पूर्वी फडणवीस पंतप्रधान व्हावेत, अशी आपली इच्छा असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. (Devendra Fadnavis)
एकदातरी मराठी माणूस पंतप्रधान व्हावा, अशी आमची इच्छा आहे. मात्र, देवेंद्र फडणवीस यांना भाजप पुढे नेईल की एवढ्यावरच मर्यादित ठेवणार, हे पाहावं लागेल,” असंही वडेट्टीवार म्हणाले. (Devendra Fadnavis)
जरांगे यांच्या मागण्यांवर भाष्य करण्यास नकार
मनोज जरांगे यांच्या कुणबी नोंदी आणि प्रमाणपत्राच्या मागणीबाबत वडेट्टीवार यांनी सरकार आणि जरांगे यांच्यातील भूमिकेवर भाष्य करण्यास नकार दिला. जातनिहाय जनगणना करा आणि ज्याचा अधिकार आहे त्याला तो द्या, अशी काँग्रेसची भूमिका असल्याचं त्यांनी सांगितलं. (Devendra Fadnavis)
बोगस नोंदी असल्यास त्या न्यायालयात टिकणार नाहीत. कोणाच्याही मागणीवर केवळ दबावाखाली निर्णय न घेता न्याय आणि संविधानाच्या चौकटीत निर्णय झाले पाहिजेत, असंही त्यांनी स्पष्ट केलं. Devendra Fadnavis()
आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सरकारला आवाहन
राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आदिवासी विद्यार्थ्यांशी चर्चा करण्याबाबत पत्र लिहिल्याच्या मुद्द्यावरही वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली. आदिवासी विद्यार्थिनीने कार्यक्रमात आपल्या समस्या मांडल्या असून, सरकारने या प्रश्नांना प्राधान्य देऊन विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवाव्यात, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. (Devendra Fadnavis)
सुटे तेल विक्रीच्या निर्णयावरही टीका
सुटे तेल विक्री बंदीचा निर्णय चुकीचा असल्याचं वडेट्टीवार म्हणाले. तुकाराम मुंडे यांनी घेतलेला निर्णय मंत्रिमंडळाने रद्द केला असेल तर तो योग्य निर्णय असल्याचं त्यांनी सांगितलं. गरीब आणि मध्यमवर्गीय नागरिक आपल्या गरजेनुसार सुटे तेल खरेदी करतात, त्यामुळे हा निर्णय सामान्य जनतेवर अन्याय करणारा असल्याची टीका त्यांनी केली. (Devendra Fadnavis)
दरम्यान, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा असल्याचंही वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं. राहुल गांधी तरुण आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी त्यांच्या पाठीशी उभे असल्याचं त्यांनी सांगितलं. नागपुरातील ‘छात्रो की गूंज’ कार्यक्रमासाठी राहुल गांधी यांनी होकार दिला असून, कार्यक्रमाची तारीख अद्याप निश्चित झालेली नसल्याची माहिती त्यांनी दिली. (Devendra Fadnavis)






