MHADA Pune Lottery 2026 : पुणेकरांसाठी गुड न्यूज! म्हाडाकडून 4,462 घरांची लॉटरी जाहीर; किंमती 13 लाखांपासून…
MHADA Pune Lottery 2026 : पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात हक्काचे घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांसाठी म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे ४,४६२ सदनिकांची (Flats) संगणकीय सोडत जाहीर करण्यात आली आहे.

MHADA Pune Lottery 2026 : पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. म्हाडाच्या पुणे मंडळाने तब्बल 4,462 सदनिकांच्या संगणकीय सोडतीची घोषणा केली आहे. घरांच्या किमती सुमारे 13 लाख रुपयांपासून सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. (MHADA Pune Lottery 2026)
अर्ज भरण्यास सुरुवात
या लॉटरीसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी आणि अर्ज भरण्याची प्रक्रिया 24 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 12 वाजता सुरू झाली आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत 15 सप्टेंबर 2026 रात्री 11.59 वाजेपर्यंत आहे. सोडतीमध्ये पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील विविध भागांमध्ये सदनिका उपलब्ध आहेत. (MHADA Pune Lottery 2026)
पुण्यात कुठे मिळणार घर?
20 टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत पुणे महापालिका हद्दीतील धानोरी, वारजे, कात्रज, हडपसर, पाषाण, खराडी, बाणेर, धायरी, लोहगाव, बिबवेवाडी, मुंढवा, उंड्री, वडगाव, बावधन आणि कोंढवा खुर्द आदी भागांमध्ये सदनिका उपलब्ध आहेत. 15 टक्के सामाजिक गृहनिर्माण योजनेअंतर्गत मांजरी खुर्द, म्हाळुंगे आणि भूगाव येथील सदनिकांचाही समावेश आहे. (MHADA Pune Lottery 2026)
पिंपरी-चिंचवडमध्येही मोठी संधी
पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत मोशी, किवळे, डुडूळगाव, ताथवडे, वाकड, चिखली, रावेत, पुनावळे, बालेवाडी, रहाटणी, वडमुखवाडी, मानुर्डी, पिंपळे सौदागर आणि पिंपळे गुरव आदी भागांमध्ये घरं उपलब्ध आहेत. (MHADA Pune Lottery 2026)
13 ऑक्टोबरला सोडत
लॉटरीची महत्त्वाची तारीख म्हणजे 13 ऑक्टोबर 2026. या दिवशी सकाळी 11 वाजता संगणकीय सोडत काढण्यात येणार आहे.
अर्ज सुरू – 24 ऑगस्ट 2026
अर्जाची अंतिम मुदत – 15 सप्टेंबर 2026
RTGS/NEFT द्वारे अनामत रक्कम – 16 सप्टेंबर 2026
प्रारूप यादी – 29 सप्टेंबर 2026
हरकती/दावे – 1 ऑक्टोबर 2026
अंतिम यादी – 8 ऑक्टोबर 2026
संगणकीय सोडत – 13 ऑक्टोबर 2026
EWS आणि LIG साठी उत्पन्न मर्यादा
EWS (अत्यल्प उत्पन्न गट) : वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 6 लाख रुपयांपर्यंत
LIG (अल्प उत्पन्न गट) : वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 9 लाख रुपयांपर्यंत
पती-पत्नीचे एकत्रित उत्पन्न ग्राह्य धरले जाणार आहे. उत्पन्नाचा पुरावा म्हणून आयकर विवरणपत्र किंवा तहसीलदारांचा दाखला आवश्यक आहे. (MHADA Pune Lottery 2026)
अर्ज कुठे करायचा?
अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी पात्रता, अटी-शर्ती आणि माहिती पुस्तिका काळजीपूर्वक वाचणे महत्त्वाचे आहे.
अधिकृत अर्ज आणि माहिती MHADA Housing Portal किंवा MHADA अधिकृत संकेतस्थळ येथे उपलब्ध आहे.
अर्ज करण्यापूर्वी केवळ अधिकृत MHADA संकेतस्थळावरील माहितीवरच विश्वास ठेवा. (MHADA Pune Lottery 2026)
MHADA Lottery: म्हाडाच्या सोडती तूर्तास नकोच! निवडणूक आयोगाने परवानगी नाकारली





