अचानक एकनाथ शिंदेंनी PM मोदींची भेट का घेतली? आतली बातमी समोर; ‘या’ आहेत प्रमुख मागण्या

या दोन्ही घडामोडी अत्यंत महत्वाच्या आहेत. दिल्लीत मोंदींची भेट घेतल्यानंतर शिंदेंनी माध्यमांसमोर येत दिवाळीनिमित्त भेट घेतले असल्याचे सांगितले. मात्र, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट का घेतली? याची माहिती आता समोर आली आहे.
- एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्ताच्या हवालानुसार, मुंबई महापालिका निवडणुकीत महायुती मजबूत राहण्यासाठी शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपमध्ये न्याय्य जागावाटणी व्हावी.
- मुंबई महापालिकेत महायुतीतील प्रमुख घटक म्हणून शिवसेनेला किमान ५० टक्के जागा मिळाल्याच पाहिजेत.
- महापालिका निवडणुकीआधी ‘महायुती’मध्ये जागावाटणीची समीकरणे स्पष्ट व्हावीत.
- शनिवारी दिल्लीत पंतप्रधान आणि शिंदे यांच्यात सुमारे दीड तास चर्चा झाली.
- ठाणे आणि कल्याण महापालिका या शिवसेनेच्या पारंपरिक सत्ता असलेल्या जागा आहेत. त्या पार्श्वभूमीवर या दोन्ही महानगरपालिकांमध्ये ७० टक्के जागा शिवसेना (शिंदे गट) ला देण्याची मागणीही शिंदे यांनी केली असल्याचे सूत्रांनी सांगितले.
ठाण्यातही भाजपकडून स्वबळाची चाचपणी
मुंबई महापालिकेत एकूण २२७ जागा आहेत. भाजपने १५० जागा लढणार असल्याचा नारा दिला आहे. यामुळे साहजिकच महायुतीमधील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला मोजक्याच जागा येतील. ठाण्यातही भाजपकडून स्वबळाची चाचपणी सुरू झाली आहे. यामुळे शिवसेनेने या ठिकाणी जागावाटपाची मागणी केली असल्याची माहिती मिळत आहे.
शिंदेंची भूमिका
सर्वांत महत्वाचे म्हणजे एकनाथ शिंदे यांनी महायुतीमध्ये जागावाटपाची समीकरणे स्पष्ट व्हावीत ही प्रमुख मागणी पंतप्रधान मोंदीकडे केली असल्याचे म्हटले जात आहे. तसेच मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील इतर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महायुती एकजूट राखून लढावी, अशी भूमिका देखील एकनाथ शिंदे यांनी मांडली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.





