Sanjay Raut : “हे कोण माफ करणारे?”; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या व्हिडिओवर संजय राऊतांचा निशाणा
Sanjay Raut : मुळात मुलांनी मोदींकडे माफी मागितलेली नाही - संजय राऊत

Sanjay Raut : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी रात्री उशिरा सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत जंतर-मंतर येथे आंदोलनादरम्यान काही विद्यार्थ्यांकडून शिवीगाळ झाल्याचा उल्लेख केला. ज्यात त्यांनी आंदोलनादरम्यान आपल्यासह आपल्या दिवंगत आईलाही शिवीगाळ करण्यात आल्याचे सांगितले. (Sanjay Raut)
मात्र, या दिशाभूल झालेल्या मुलांना न्यायालयात खेचून किंवा शिक्षा करून प्रश्न सुटणार नाही. त्यामुळे त्यांना माफ करायचे आहे, अशी भूमिका मोदी यांनी मांडली. पंतप्रधानांच्या या वक्तव्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पत्रकार परिषदेत जोरदार टीका केली. (Sanjay Raut)
संजय राऊत म्हणाले, “हे कोण माफ करणारे? ही त्यांची आणखी एक शरणागती आहे. मुळात मुलांनी त्यांच्याकडे माफी मागितलेली नाही. या देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री हे मनाने आणि विचाराने भरकटलेले आहेत. त्यांनी त्यांचे सल्लागार बदलायला पाहिजेत. तुम्ही माफ करताय, तर मग शेकडो मुलांचे चारित्र्य कशाला तपासत आहात? आता चंद्रकांत पाटील दगडाचे ठसे घ्यायला गेलेले आहेत. त्यांनी तिथे कोरीव काम सुरू केले आहे,” असा टोलाही राऊतांनी लगावला.
संजय राऊत पुढे म्हणाले की, “आपण कोणालातरी जर्सी गाय, पन्नास कोटींची गर्लफ्रेंड म्हणाला होतात. तुमच्या अंगावर आल्यावर तुम्ही दुसऱ्यांची आई-बहीण काढली होती, हे विसरत आहात का? कोणीही तुमच्या आई-बहीणीवर गेलेले नाही. तो भावनांचा उद्रेक होता. ज्या पद्धतीने हा देश चालवला जात आहे, त्याला हुकूमशाही म्हणतात. त्या हुकूमशाहीविरोधात पोरं रस्त्यावर आली आणि याच मुलांच्या मदतीने तुम्ही 2014 साली सत्तेवर आला होतात. सध्या पंतप्रधानांना मानसोपचारतज्ज्ञाची गरज आहे,” असेही त्यांनी म्हटले. (Sanjay Raut)
पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले? (Sanjay Raut)
“जंतर मंतरवर जे झालं ते देश आणि जगानं पाहिलं आहे. काही मुलांनी घाणेरड्या शब्दात शिवीगाळ केली. कोणत्याही सभ्य समाजाला न शोभणार नाहीत, अशा शब्दांचा वापर करण्यात आला. मला तर शिव्या दिल्याच पण माझ्या स्वर्गीय आईला देखील शिवीगाळ करण्यात आली. किती घाणेरडे स्वरुप होते. पण, मला आज बोलायचंय, लहानपणात चुका होतात आणि लहानपणात या चुकांमधून सुधारण्याची संधी देखील असते,” असे मोदी म्हणाले. (Sanjay Raut)
“मला त्यांना माफ करायचे आहे. माणसांकडून चुका होतात. मात्र, आपल्या मुली अशा प्रकारची अपशब्दांची भाषा वापरत आहेत, हा संस्कृतीला धक्का आहे. अखेर ती मुले आपलीच आहेत. त्यांना योग्य मार्ग दाखवणे हे आपले कर्तव्य आहे. या मुलांना मिठीत घेऊन, योग्य रस्ता दाखविण्याची हीच वेळ आहे. ही दिशा भरकटलेली मुलं आहेत, त्यांना योग्य रस्ता दाखवणं आपलं काम आहे. त्यांना शिक्षा देणं, न्यायालयाच्या फेऱ्या मारायला लावणं यामुळे परिस्थिती बदलणार नाही, मला त्यांना माफ करायचं आहे,” असे म्हणत मोदींनी आंदोलकांना माफ केल्याचे जाहीर केलं. (Sanjay Raut)
हेही वाचा:





