प्राचीन काळी माणसं एकमेकांना मारून खात होते का? नुकतेच शास्त्रज्ञांनी एक संशोधन केले आहे. या संशोधनात त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. शास्त्रज्ञांच्या मते, या संशोधनात असे पुरावे मिळाले आहेत, ज्यावरून असे दिसून येते की मानवाचे पूर्वज नरभक्षक असावेत. केनियामध्ये 1.45 दशलक्ष वर्ष जुन्या मानवी पूर्वजांची हाडे सापडली.
या हाडांवर केलेला अभ्यास सायंटिफिक जर्नलमध्ये प्रकाशित झाला असून त्यात अनेक खुलासे करण्यात आले आहेत. अभ्यासात असे आढळून आले आहे की, मानवाच्या पूर्वजांनी जिवंत राहण्यासाठी एकमेकांना मारून खाल्ले असावेत. केनियामध्ये सापडलेल्या हाडात नऊ ठिकाणी कापलेल्या खुणा आढळल्या आहेत. हे सूचित करते की मृत्यूपूर्वी मानवांमध्ये परिस्थिती सामान्य नव्हती. चला जाणून घेऊया मानवाच्या पूर्वजांबाबत वैज्ञानिकांनी कोणते खुलासे केले आहेत.
अमेरिकेत असलेल्या स्मिथसोनियन नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्रीच्या संशोधकांनी मानवी पूर्वजांवर केलेल्या संशोधनात अनेक आश्चर्यकारक दावे केले आहेत. पायाच्या हाडांना दगडी हत्यारांनी जखमा झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यांचे म्हणणे आहे की मानवी प्रजातींचा समावेश असलेल्या नरभक्षकपणाचे हे सर्वात जुने प्रकरण असावे.
संशोधक ब्रायना पोबिनर यांनी सांगितले की, तिने पायावर दिसणार्या खुणा तपासल्या. त्यात सिंहासारख्या प्राण्याच्या दोन खुणा आणि माणसाने शिकार केल्याच्या ९ खुणा होत्या. अवशेष पाहता, दगडाने वार करून हत्या करण्यात आल्याचे दिसते.
पायाच्या खालच्या बाजूला जखमांच्या खुणा दिसत असल्याचे ब्रायना यांनी सांगितले. प्राण्यांचा तो भाग जो खाण्यासाठी वापरला जात होता, त्या ठिकाणी ही खूण असल्याचे त्यांनी सांगितले.
संशोधकांनी सांगितले की, आतापर्यंत मिळालेल्या पुराव्यांवरून असे दिसून येते की त्यावेळी पायाचे मांस खाल्ले जात होते. शरीर सुदृढ राहण्यासाठी ते खाण्याची प्रथा होती. केनियाच्या नैरोबी म्युझियममध्ये मानव नरभक्षक असल्याचा पुरावा पहिल्यांदाच सापडल्याचे अहवालात सांगण्यात आले आहे. यानंतर फ्रान्समधील ला रोशे कोटार्डच्या गुहेत सापडलेल्या अवशेषांमधून मानवी नरभक्षकपणाचे पुरावे मिळाले.
संशोधकांनी अहवालात सांगितले आहे की, मानव नरभक्षक होते याची 100 टक्के पुष्टी होणे बाकी आहे. दगडी अवजारांशी संबंधित पुरावे सापडले आहेत, त्या वेळी ही उपकरणे कोणत्या प्रजातींनी वापरली हे शोधणे सोपे नाही.
संशोधकांचे म्हणणे आहे की हे देखील शक्य आहे की त्या वेळी, एखाद्या मनुष्याने मारण्यापूर्वी, त्या व्यक्तीवर सिंह किंवा चित्तासारख्या प्राण्यांनी हल्ला केला होता. पायावर सापडलेल्या खुणाही अशीच कथा सांगतात. जीवाश्म हे प्रागैतिहासिक नरभक्षकपणाचे चिन्ह असू शकते, परंतु हे एखाद्या प्रजातीने स्वतःच्या जातीला मारल्याचा प्रसंग असण्याचीही शक्यता आहे.