ती इंच ना इंच जागा आम्ही घेणारच; अजित पवार यांचे बोम्मई यांना चोख प्रत्युत्तर

नागपूर – महाराष्ट्राला एक इंचही जागा देणार नाही, असा ठराव कर्नाटक सरकारने घेतला आहे. मी अगोदरच सांगितलं आहे की जेवढी जागा मराठी माणूस म्हणतोय की आमच्याकडे आली पाहिजे, तो भाग महाराष्ट्रात आला पाहिजे ती इंच ना इंच जागा आम्ही घेणार, ते काय नाही देणार त्यांच्या हातात काय आहे?, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी बोम्मई यांना चोख प्रत्युत्तर दिले.
गौतमी पाटीलच्या अडचणीत वाढ? कार्यक्रमांवर महाराष्ट्रात बंदी घालण्याची मागणी
अजित पवार म्हणाले, तिथे जर सगळ्यांना थांबवलेले असेल, कोणी एकमेकाला अपशब्द वापरू नका म्हटले, एकमेकाच्या राज्यातील लोकांना येण्याजाण्यास कोणी अडवू नका, असे सांगितले. बंधन घालू नका असे सांगितले. कोणत्याही मराठी भाषिकांच्या गाड्या तोडूफोडू नका? असे सांगितले, असे होऊनदेखील पुन्हा येरे माझ्या मागल्याच चालेले आहे.
गौतमी पाटीलच्या अडचणीत वाढ? कार्यक्रमांवर महाराष्ट्रात बंदी घालण्याची मागणी
पुन्हा ते त्या पद्धतीनेच ठराव करत आहेत. हे आताच्या शिंदे-फडणवीस सरकारचे अपयश आहे. हे कशामुळे घाबरत आहेत, कशामुळे ठराव करत नाहीत? कशामुळे आक्रमकपणे महाराष्ट्रातील जो भाग तिथे मराठी माणूस राहतोय आणि वर्षानुवर्षे पिढ्यांपिढ्या झगडतोय, त्यांना दिलासा देण्याचे काम हे सरकार करत नाही. अशा प्रकारचं एकंदरित चित्र आहे, असेही अजित पवार म्हणाले.
याशिवाय, मी कर्नाटक सरकारने केलेल्या ठरावाची तीव्र निषेध करतो, आमच्या सगळ्यांचा विरोध आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीही यामध्ये बोटचेपेपणाचं धोरण घेत आहेत, आक्रमक राहत नाहीत. त्यांनीही दोष देतो की, हे कुठंतरी महाराष्ट्राचे समर्थन करण्यात कमी पडत आहेत, हे राज्य सरकारचे अपयश असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.





