Rohit Pawar : विकासकामे थांबवून दुष्काळ जाहीर करा; रोहित पवारांची सरकारकडे मागणी
अनेक ठिकाणी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस(शप) पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) मराठवाडा दौऱ्यावर आहेत.

Rohit Pawar : राज्यात बहुतांश भागात पाऊस नसल्याने शेतकऱ्यांची पिके वाया गेली आहे. अनेक ठिकाणी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस(शप) पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) मराठवाडा दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन थेट पिकांची पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला.
पवार (Rohit Pawar) म्हणाले, शक्तीपीठ महामार्गासारख्या विकासकामांचा निधी दुष्काळग्रस्तांकडे वळवावा आणि तात्काळ मदत जाहीर करावा. खरिपात 75 टक्क्यांहून अधिक नुकसान झाले आहे. त्यामुळे रब्बी हंगामाचीही आशा संपली असून, जनावरांच्या चाऱ्यासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पुढील दहा महिने सर्वसामान्य शेतकऱ्यांना कसे जगवायचे, हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे सरकारने तात्काळ मदत जाहीर करावी.
रोहित पवार (Rohit Pawar) हे मराठवाड्यातील धाराशिव आणि बीड जिल्ह्यांतील पाहणीनंतर ते लातूर जिल्ह्यातील किनगाव येथे दाखल झाले. यावेळी किनगावमधील शेतकऱ्यांनी पवार यांच्यासमोर आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. प्रशासनाकडून पंचनामे आणि मदत मिळत नसल्याबद्दल शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
आज दिवंगत अजित पवार असते तर नियम आणि अटींमध्ये अडकले नसते, ते जनतेसाठी काम करणारे नेतृत्व होते. जनतेच्या प्रश्नांची त्यांना जाणीव होती. मात्र, आज महायुतीतील नेत्यांना जनतेच्या प्रश्नांचे देणे-घेणे नाही, असे टीका पवार यांनी केली.






