“होम क्वारंटाइन’साठी आरोग्य विभागच्या जोरदार हालचाली
रेडा- सध्या करोनाच्या वायरस प्रादुर्भावाने लोकांची झोप उडाली आहे. आता या रोगाची लागण ग्रामीण भागातही झाली आहे. जिल्ह्यातील वेल्हे गावात आणि शिरूर तालुक्यातील सणसवाडी गावात पसरला आहे. त्यामुळे गावागावांत खबरदारी घेत असून अनेक गावांनी आपल्या सीमाही बंद केल्या आहेत. त्याचप्रमाणे इंदापूर तालुक्यातील प्रशासनही उपाययोजना करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करीत आहेत. दरम्यान, तालुक्याच्या बाहेरून घरी परतलेल्या जवळपास 5 हजार नागरिकांवर आरोग्य विभागाची पाळत ठेवून आहेत, तरीही नागरिकांनी कृपा करून घराबाहेर पडू नका, असे आवाहन प्रशासनासह सर्व स्तरातून करण्यात येत आहे.
इंदापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजयकुमार परीट म्हणाले की, इंदापूर तालुक्यातील जवळपास अणि 103 ग्रामपंचायतींचा आढावा घेतलेला आहे. यामध्ये 5 हजार संख्येपेक्षा अधिक पुणे व मुंबई येथून गावाकडे आलेल्या नागरिकांची संख्या आहे. या सर्व नागरिकांना “होम क्वारंटाइन करण्यासाठी यंत्रणेच्या आरोग्य विभागाच्या हालचाली सुरू आहेत. यामध्ये या सर्व नागरिकांची ट्रायव्हल “हिस्ट्री’ घेण्याचे काम सुरू आहे. तसेच यांच्यावर उपचारासाठी डॉक्टर रजिस्टर करायचे आहेत. जर ते “होम क्वारंटाइन’साठी तयार नसले तर त्यांना जवळपास तालुक्यातील 979 शाळेच्या वर्गखोल्या आम्ही उपलब्ध केले आहेत. जर यामधले नागरिक पॉझिटिव्ह सापडले तर त्यांना पुण्यातील नायडू हॉस्पिटलमध्ये पाठवले जाईल.
- प्रशासन सांगते एक; मात्र चित्र उलटे
सध्या करोनाचे जागतिक संकट आहे, हे संकट रोखण्यासाठी प्रशासनातील पोलीस यंत्रणेचे पुरेपूर प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येते. मात्र, गावाकडील तलाठी, ग्रामसेवक गावात मुख्यालये आहेत असे चित्र इतर प्रशासनाकडून दाखवले जाते. मात्र, कित्येक बहुतेक गावात या पदाचे अधिकारी तसेच पंचायत समितीचे विस्तार अधिकारी हुडकून देखील सापडत नाहीत. त्यामुळे जे अधिकारी मुख्यालयी राहात नाहीत त्यांच्यावर थेट निलंबनाची कार्यवाही करावी, अशीही मागणी जोर धरू लागली आहे. तर इंदापूर पंचायत समितीत काम करणारे विस्ताराधिकारी या यंत्रणेत कोठेही दिसत नाहीत, त्यामुळे हे विस्ताराधिकारी कुठे आहेत, असा सवाल नागरिक करीत आहेत. - पोलीस ठाण्याकडे कोणी फिरके ना
छोटे-मोठे भांडण झाले तरी गाठ पोलीस ठाणे, अशी परिस्थिती इंदापूर पोलीस ठाण्याची आहे. मात्र, रविवारी (दि. 24) जनता कर्फ्यू अन् सोमवार (दि. 25) पासून राज्यात संचारबंदी लागू झाल्याने मोठे गुन्हे तर सोडाच पण छोटे तंटेही झाले नसल्याने इंदापूर पोलीस ठाण्याकडे साधी तक्रार देण्यासही कोणी फिरकले नसल्याने पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद झालेली नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली. - गोल वर्तुळात उभे राहूनच वस्तू खरेदी
करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन असलेले तरी जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी मुभा दिलेली आहे. मात्र, ती खरेदी करण्यासाठी या दुकानदारांनी योग्य खबदारी घेण्याचे प्रशासनाचे आदेश आहे. यामध्ये प्रत्येकामध्ये एक मीटरच अंतर राहील या पद्धतीची सोय जीवनावश्यक वस्तू विक्री करणाऱ्यांनी केली आहे. संबंधितांनी दुकानासमोर पांढऱ्या रंगाची वर्तुळे आखून दिलेली आहेत. या गोल वर्तुळामध्ये उभे राहून गर्दी न करता जीवनावश्यक वस्तू खरेदी केल्या जात आहेत त्यामुळे शिस्त व खबरदारी यावरून दिसून येत आहे. - इंदापूर पंचायत समितीचा आरोग्य विभाग गावाकडील आशा वर्कर यांच्यामार्फत सर्वे करीत असून यामध्ये आशा वर्कर यांना तशा सूचना दिलेल्या आहेत, यांच्याकडून आजपर्यंत जवळपास 1238 पुणे-मुंबई येथून इंदापूर तालुक्यात आलेल्या नागरिकांची नोंद झालेली आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना मास्कपुरवठा आरोग्य उपकेंद्रमार्फत केले जात आहे. मात्र, मास्कचा तुटवडा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे, आम्ही प्रत्येक उपकेंद्रासाठी किमान दोन हजार मास्क उपलब्ध करून देण्यासाठी मागणी केली आह.
– डॉ. सुरेखा पोळ, आरोग्य अधिकारी, इंदापूर पंचायत समिती - शासनाच्या नियमाप्रमाणे प्रत्येक गावातील ग्रामसेवक व कर्मचारी मुख्यालय सद्यस्थितीला असणे गरजेचे आहे. इंदापूर तालुक्यामध्ये जवळपास 85 ग्रामसेवक कार्यरत आहेत. तर 100च्या आसपास कर्मचारी कार्यरत आहेत. तालुक्यातील कोणतेही गावांमध्ये जर ग्रामसेवक व इतर कर्मचारी मुख्यालय नसतील तर थेट माझ्याशी संपर्क करा.
– विजयकुमार परीट, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, इंदापूर तालुका