Mehboob Shaikh : आपल्या सोबत माणूस घ्यायचा अन्…; फडणवीसांच्या त्या वक्तव्यावर शरद पवारांच्या शिलेदाराचा थेट हल्लाबोल

Mehboob Shaikh : काल पुण्यात लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात बोलताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्याच्या उद्योगात दादागिरी आहे, असे विधान केले होते. त्यांच्या या विधानावर शरद पवार गटाचे पुण्यातील पदाधिकारी मेहबूब शेख यांनी भाजप आणि फडणवीसांवर टीकास्त्र डागले.
खांद्यावर हात ठेवायचा आणि केसाने गळा कापायचा भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्र फडणवीसांची निती असल्याचे टीका त्यांनी केली आहे. केसाने गळा कापायचा. अगोदर शिंदेंचा कार्यक्रम लावला. आता पुण्यात येवून अजितदादांचा कार्यक्रम लावलाय.. आपल्यासोबत माणूस घ्यायचा आणि त्याला संपवायचं यालाच तर भारतीय जनता पार्टी म्हणतात, असं शेख म्हणाले.
यवत येथील घडलेल्या घटनेबाबतही त्यांनी भाष्य केले. हा अत्यंत दुर्देवी प्रकार आहे. आरोपीला कठोर करावाई करण्याची मागणी त्यांनी केली. संबंधित आरोपीवर मकोका अंतर्गत कारवाई करा. सगळे गुन्हे दाखल करा असे ते म्हणाले.
ज्यांचे कायदा सुवस्था सांभाळण्याचे काम आहे, त्या सत्ताधारी पक्षाचे आमदार येऊन एका समाजाला टार्गेट करणारी चिथावणी करणारी भाषणं देतात, या सरकारला महाराष्ट्रात दंगली घडवायच्या आहेत का? असा उद्विन प्रश्न त्यांनी उपस्थित केला.





