Vaibhav Suryavanshi : ‘सूर्य’वंशात जन्माला आलेल्या वैभवला कोणीच रोखू शकत नाही! युवा खेळाडूच्या वादळी खेळीवर सेहवाग फिदा
Vaibhav Suryavanshi : वैभवच्या या खेळीने भारताचा माजी स्फोटक सलामीवीर वीरेंद्र सेहवाग भारावून गेला आहे. त्याने सोशल मीडियावर खास पोस्ट करत वैभवचे कौतुक केले आहे.

Virendra Sehwag Praises Vaibhav Suryavanshi Innings : भारतीय क्रिकेटचा नवा ‘झगमगता तारा’ वैभव सूर्यवंशीने अंडर-१९ विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात वादळ निर्माण केले आहे. इंग्लंडविरुद्धच्या महामुकाबल्यात वैभवने केवळ ८० चेंडूंत १७५ धावांची विष्फोटक खेळी करत क्रिकेट विश्वातील दिग्गजांना थक्क केले. त्याच्या या झंझावातामुळे भारताने निर्धारित षटकांत ४११ धावांचा डोंगर उभा केला असून, हा अंडर-१९ विश्वचषकाच्या फायनलमधील सर्वोच्च स्कोअर ठरला आहे. त्याच्या या खेळीवर माजी खेळाडू वीरेंद्र सेहवागने फिदा झाला आहे.
१७५ धावांपैकी १५० धावा फक्त बाउंड्रीच्याचं!
वैभव सूर्यवंशीने आज मैदानावर ‘विनाशकारी’ फलंदाजीचा नजराणा पेश केला. त्याने ८० चेंडूंचा सामना करताना १७५ धावांच्या खेळीत १५ चौकार आणि तितकेच षटकार ठोकले. म्हणजेच त्याने १५० धावा केवळ चौकार आणि षटकारांच्या मदतीने वसूल केल्या. विशेष म्हणजे त्याने अवघ्या ५५ चेंडूंत आपले शतक पूर्ण केले. त्याने कर्णधार आयुष म्हात्रेसोबत (५३ धावा) दुसऱ्या विकेटसाठी १४२ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली.
“सूर्याला कोणीच रोखू शकत नाही!” – सेहवाग फिदा
VAIBHAV SURYAVANSHI 🌞💥
175 off 80 balls
15 fours + 15 sixes-equal fours , equal sixes, equal destruction.
Suryavanshi = Born from the Sun dynasty
Today he batted like one!
Blazing. Blinding. Unstoppable.
England bowlers tried everything.
But you can’t stop the SUN.“The… pic.twitter.com/4fABfGbcb1
— Virrender Sehwag (@virendersehwag) February 6, 2026
वैभवच्या या खेळीने भारताचा माजी स्फोटक सलामीवीर वीरेंद्र सेहवाग भारावून गेला आहे. सोशल मीडियावर कौतुक करताना सेहवागने लिहिले, “तितकेच चौकार, तितकेच षटकार, अन् तेवढाच विध्वंसक! सूर्यवंशी म्हणजे सूर्यवंशात जन्मलेला. आज तो तसाच खेळला. इंग्लंडच्या गोलंदाजांनी सर्व प्रयत्न केले, पण तुम्ही सूर्याला रोखू शकत नाही. भारतीय क्रिकेटमध्ये सूर्योदय झाला आहे!”
भारताने मोडला ऑस्ट्रेलियाचा विक्रम –
वीरेंद्र सेहवागने वैभव सूर्यवंशीच्या खेळीचे कौतुक केले
भारतीय अंडर-१९ संघाने प्रथम फलंदाजी करताना ४११ धावा फलकावर लावल्या. विश्वचषकाच्या फायनलमध्ये ४०० पार धावसंख्या उभारणारा भारत हा पहिलाच संघ ठरला आहे. यापूर्वी २०२४ च्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने भारतासमोर २५३ धावा केल्या होत्या, जो फायनलमधील सर्वोच्च स्कोअर होता.
नॉकआउटमध्ये पहिल्यांदाच ३५० पार –
भारताने अंडर-१९ विश्वचषकाच्या नॉकआउट फेरीत पहिल्यांदाच ३५० धावांचा टप्पा ओलांडला आहे. यापूर्वी २०१६ मध्ये नामीबियाविरुद्ध भारताने ३४९ धावा केल्या होत्या. अखेरच्या षटकांत अभिज्ञान कुंडू (४०) आणि कनिष्क चौहान (३७) यांनी केलेल्या फटकेबाजीमुळे भारताने ४०० धावांचा ऐतिहासिक टप्पा गाठला.





