KKR vs LSG : निकोलस पूरनचा कहर! वीरेंद्र सेहवागला मागे टाकत आयपीएलमध्ये केला खास पराक्रम

KKR vs LSG Nicholas Pooran breaks Virender Sehwag record : आयपीएल २०२५ चा २१ वा सामना लखनौ सुपर जायंट्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना लखनौ सुपर जायंट्सने धावांचा डोंगर उभारला. या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सकडून निकोलस पूरन आणि मिशेल मार्श यांनी अतिशय स्फोटक फलंदाजी केली आणि म्हणूनच लखनौने केकेआरला विजयासाठी २३९ धावांचे लक्ष्य दिले आहे. निकोलस पूरनने आपल्या स्फोटक फलंदाजीने वीरेंद्र सेहवागचा एक मोठा विक्रमही मोडला. त्याचबरोबर लखनौ सुपर जायंट्सने आयपीएलमधील त्यांची दुसरी सर्वोच्च धावसंख्या नोंदवली आहे.
मिचेल मार्शने साकारली जबरदस्त खेळी –
खरंतर, ईडन गार्डन्स मैदानावर, कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार अजिंक्य रहाणेने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर मिचेल मार्श, एडेन मार्क्रम आणि निकोलस पूरन यांनी त्यांच्या स्फोटक फलंदाजीने रहाणेचा निर्णय चुकीचा सिद्ध केला. एडेन मार्क्रम आणि मिशेल मार्श या सलामी जोडीने पहिल्या विकेट्ससाठी ९९ धावांची भागीदारी केली. यादरम्यान, एडेन मार्क्रमने २८ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकारांसह ४७ धावांची खेळी केली. मिचेल मार्शनेही खूप वादळी खेळी केली. त्याने फक्त ४८ चेंडूत ६ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने ८१ धावा केल्या.
Milestone Unlocked 🔓
2⃣0⃣0⃣0⃣ #TATAIPL runs and counting for the power-packed Nicholas Pooran 💪#LSG 170/1 after 15 overs.
Updates ▶ https://t.co/3bQPKnwPTU#KKRvLSG | @nicholas_47 pic.twitter.com/kS1j2S6Bg9
— IndianPremierLeague (@IPL) April 8, 2025
निकोलसने स्फोटक फलंदाजीच्या जोरावर केला मोठा विक्रम –
यानंतर, निकोलस पूरनने पण लखनौ सुपर जायंट्सकडून अतिशय स्फोटक फलंदाजी केली. त्याने फक्त २१ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. तर त्याने ३६ चेंडूत ७ चौकार आणि ८ षटकारांसह नाबाद ८७ धावांची शानदार खेळी साकारली. या धमाकेदार खेळीदरम्यान निकोलस पूरनने काही मोठे विक्रमही आपल्या नावावर केले. निकोलस पूरनने आयपीएलमध्ये त्याचे १५० षटकार पूर्ण केले आहेत. याशिवाय त्याने वीरेंद्र सेहवागचा एक मोठा विक्रम मोडला आहे.
निकोलस पूरन आता चेंडूंच्या बाबतीत आयपीएलमध्ये २००० धावा पूर्ण करणारा दुसरा सर्वात जलद फलंदाज बनला आहे. या प्रकरणात विक्रम आंद्रे रसेलच्या नावावर आहे. रसेलने आयपीएलमध्ये आपल्या २००० धावा ११२० चेंडूत पूर्ण केल्या होत्या. आता निकोलस पूरनने १२११ चेंडूत ही कामगिरी केली आहे. आता वीरेंद्र सेहवाग या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. सेहवागने आयपीएलमध्ये १२५१ चेंडूत २००० धावा पूर्ण केल्या होत्या. त्याला निकोलस पूरनने मागे टाकले आहे.





