Virat Kohli Century : विराटचं शतकासह दमदार कमबॅक! १५ वर्षांनंतर पुनरागमन करताना सचिनचचा मोडला ‘वर्ल्ड रेकॉर्ड’

Virat Kohli Century in Vijay Hazare Trophy 2026 : टीम इंडियाचा दिग्गज फलंदाज विराट कोहली सध्या तुफान फॉर्ममध्ये असून त्याच्या बॅटमधून धावांचा पाऊस थांबण्याचे नाव घेत नाहीये. आंतरराष्ट्रीय क्रिकेट असो वा देशांर्गत, २२ यार्डच्या खेळपट्टीवर कोहलीची ‘विराट’ खेळी सुरूच आहे. नुकत्याच झालेल्या विजय हजारे ट्रॉफीमधील आंध्र प्रदेशविरुद्धच्या सामन्यात विराटने केवळ ८३ चेंडूंमध्ये झंझावाती शतक झळकावले. या शतकाच्या जोरावर त्याने सचिन तेंडुलकरचा एका मोठा विक्रम मोडला. यासह त्याने क्रिकेट विश्वाचे लक्ष वेधून घेतले आहे.
सचिन तेंडुलकरचा विश्वविक्रम मोडला –
या शतकी खेळीदरम्यान विराटने क्रिकेटचा देव मानल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरचा एक मोठा विश्वविक्रम मोडला आहे. लिस्ट-ए क्रिकेटमध्ये सर्वात जलद १६,००० धावा पूर्ण करणारा विराट जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. विराटने ही कामगिरी अवघ्या ३३० डावांत केली, तर सचिनला यासाठी ३९१ डाव लागले होते. १० हजार ते १६ हजार धावांपर्यंतचे सर्व जलद टप्पे गाठण्याचा विक्रम आता विराटच्या नावे जमा झाला आहे. यासह त्याने दिल्ली संघाला बीसीसीआयच्या ‘सेंटर ऑफ एक्सीलेंस’मधील सामन्यात विजय मिळवून दिला.
१६ वर्षांची प्रतीक्षा संपली –
U beauty❤️🔥#ViratKohli𓃵 pic.twitter.com/EKBCrLeGGI
— Asmita Roy 🇮🇳 (@VGOATKOHLI) December 24, 2025
विराट कोहली तब्बल १५ वर्षांनंतर या स्पर्धेत खेळण्यासाठी मैदानात उतरला आहे. विशेष म्हणजे, विजय हजारे ट्रॉफीमध्ये त्याने १६ वर्षांनंतर शतकी खेळी केली आहे. यापूर्वी २००९ मध्ये हरियाणाविरुद्ध त्याने १२४ धावांची खेळी केली होती. त्या मोसमात त्याने ४ शतकांच्या मदतीने एकूण ५३४ धावा कुटल्या होत्या. आता आगामी न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेच्या तयारीसाठी विराटने पुन्हा एकदा देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपला दबदबा निर्माण केला आहे.
हेही वाचा – Rohit Sharma : ३८ व्या वर्षीही रोहितचा ‘हिटमॅन’ क्लास कायम, विजय हजारे ट्रॉफीत ठोकलं विस्फोटक शतक
२०१६ चा ‘विराट’ अवतार पुन्हा सक्रिय –
विराट सध्या ज्या पद्धतीने फलंदाजी करत आहे, ते पाहता चाहत्यांना त्याच्या २०१६ मधील सुवर्णकाळाची आठवण होत आहे. मागच्या चार वनडे डावांचा विचार केल्यास विराटने तीन शतके ठोकली आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत सलग दोन शतके आणि नाबाद ६५ धावांची खेळी केल्यानंतर आता आंध्र प्रदेशविरुद्धही त्याने हाच फॉर्म कायम राखला आहे.





