Rohit Sharma : रोहित शर्माचा कहर! सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडत सुनील गावस्करांना टाकलं मागे

रोहित शर्माने सुनील गावस्करांना टाकले मागे –
या सामन्यात रोहित शर्माने केवळ विजयच मिळवला नाही, तर अनेक ऐतिहासिक विक्रमही आपल्या नावावर केले. त्याने वनडे कारकिर्दीतील 33 वे शतक झळकावले आणि भारतासाठी वनडेत शतक ठोकणारा दुसरा सर्वात वयोवृद्ध फलंदाज बनला. रोहितने हे शतक 38 वर्षे आणि 178 दिवसांच्या वयात केले, ज्यामुळे त्याने दिग्गज फलंदाज सुनील गावस्कर यांना (38 वर्षे 113 दिवस) मागे टाकले. भारतासाठी सर्वाधिक वयात वनडे शतक ठोकण्याचा विक्रम अद्याप सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे, ज्याने 38 वर्षे 327 दिवसांच्या वयात ही कामगिरी केली होती.
वनडेत शतक ठोकणारे सर्वात वयोवृद्ध भारतीय खेळाडू:
- 38 वर्षे 327 दिवस – सचिन तेंडुलकर
- 38 वर्षे 178 दिवस – रोहित शर्मा
- 38 वर्षे 113 दिवस – सुनील गावस्कर
हेही वाचा – Rohit Sharma : ‘मै पागल नही हूं, मुझे पता है…’, दमदार शतक झळकावल्यानंतर हिटमॅनचा ‘तो’ VIDEO व्हायरल
सचिन तेंडुलकरलाही टाकले मागे –
रोहित शर्माचे हे 33 वे शतक त्याच्या 268 व्या डावात आले. यामुळे त्याने सचिन तेंडुलकरलाही मागे टाकले, ज्यांने 33 वे शतक 286 व्या डावात ठोकले होते. या यादीत विराट कोहली अव्वल आहे, ज्याने अवघ्या 195 डावांत ही कामगिरी केली होती.
वनडेत 33 शतके ठोकणारे भारतीय (किमान डावात):
- 195 डाव – विराट कोहली
- 268 डाव – रोहित शर्मा
- 286 डाव – सचिन तेंडुलकर
हेही वाचा – Australian Women Cricketers : इंदौरात ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटूंची छेड काढणाऱ्या आरोपीला सहा तासात अटक!
ऑस्ट्रेलियाविरुद्ध रोहितचा जलवा कायम –
ऑस्ट्रेलियाविरुद्ध रोहित शर्माची बॅट नेहमीच तळपताना दिसली आहे. या सामन्यातही त्याने कांगारू गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. या शतकासह त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडेत सर्वाधिक शतके ठोकण्याचा सचिन तेंडुलकरच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे
ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडेत सर्वाधिक शतके:
- 9 – रोहित शर्मा
- 9 – सचिन तेंडुलकर
- 8 – विराट कोहली
- 6 – डेसमंड हेन्स





