Sachin Tendulkar : सचिन तेंडुलकरने सहकुटुंब राज ठाकरेंच्या निवासस्थानी घेतले बाप्पाचे दर्शन, फोटो होतोय व्हायरल

Sachin Tendulkar Ganpati Puja at Raj Thackeray Shivteerth : भारताचा दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनी गुरुवारी (२८ ऑगस्ट २०२५) महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) प्रमुख राज ठाकरे यांच्या मुंबईतील ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी गणपती पूजेत सहभाग घेतला. यावेळी सचिन यांनी राज ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. सचिन हे पत्नी अंजली तेंडुलकर आणि मुलगा अर्जुन तेंडुलकर यांच्यासह गणपती दर्शनासाठी ‘शिवतीर्थ’ येथे पोहोचले होते.
‘शिवतीर्थ’ येथे गणपती दर्शनासाठी सचिन आणि अर्जुन यांनी नेव्ही ब्लू रंगाचे डिझायनर कुर्ते परिधान केले होते, तर अंजली तेंडुलकर यांनी लाल रंगाची साडी नेसली होती. दर्शनानंतर तेंडुलकर कुटुंबीयांनी राज ठाकरे आणि त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांच्यासोबत गणपतीच्या मूर्तीसमोर फोटो काढले, जे व्हायरल होत आहेत.
‘शिवतीर्थ’ निवासस्थानी दीड दिवसांचा गणपती –
महान क्रिकेटर सचिन तेंदुलकर के बेटे अर्जुन तेंदुलकर का फोटो #SachinTendulkar #arjuntendulkar #mumbai #cricket #Sagai #saraTendulkar #BCCI pic.twitter.com/THw8WbKk8w
— Sunil Maurya (@smaurya_journo) August 28, 2025
राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी दीड दिवसांचा गणपती बसवण्यात आला आहे. या ठिकाणी राजकीय आणि चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवर दर्शनासाठी येत आहेत. सचिन यांच्यापूर्वी बॉलिवूड अभिनेता आमिर खान यांनीही येथे गणपति दर्शन घेतले. तसेच, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यापूर्वी ‘शिवतीर्थ’ येथे गणपतीची पूजा केली होती. त्यांनी याबाबत सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली होती.
हेही वाचा – Sanju Samson : संजू सॅमसनचा कहर! पाच दिवसात साकारली तिसरी वादळी खेळी, सूर्या-गंभीरची वाढली डोकेदुखी
गणेशोत्सवाच्या निमित्ताने ठाकरे बंधूंमधील पुनर्मिलन –
गणेशोत्सवाच्या निमित्ताने ठाकरे बंधूंमधील पुनर्मिलनही चर्चेचा विषय ठरला. २० वर्षांनंतर शिवसेना-यूबीटी प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या कुटुंबासह राज ठाकरे यांच्या निवासस्थानी भेट देऊन पूजा केली. गेल्या तीन महिन्यांत ठाकरे बंधू तिसऱ्यांदा एकत्र दिसले. यापूर्वी ५ जुलै रोजी विजय रॅलीत आणि २७ जुलै रोजी उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरे ‘मातोश्री’ येथे गेले होते.
‘शिवतीर्थ’ येथील गणेशोत्सव राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील दिग्गजांच्या भेटींमुळे चर्चेत आहे. सचिन तेंडुलकर यांच्या दर्शनाने या उत्सवाला आणखी विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.





