विजय मल्ल्याचा ७० वा वाढदिवस चर्चेत.! ललित मोदीकडून जोरदार सेलीब्रेशन, लंडनमधील ‘तो’ Video आला समोर

Lalit Modi | Vijay Mallya | Birthday party : भारतातून फरार झालेले आयपीएलचे माजी चेअरमन ललित मोदी आणि मद्यसम्राट विजय मल्ल्या पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. निमित्त आहे विजय मल्ल्याच्या ७० व्या वाढदिवसाचे, लंडनमधील ललित मोदीच्या निवासस्थानी पार पडलेल्या या शाही प्री-बर्थडे सेलिब्रेशनचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी यावर टीकेची झोड उठवली आहे. हा व्हिडिओ स्वतः ललित मोदी याने त्याच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे.
काय आहे ललित मोदीची पोस्ट :
ललित मोदीने स्वतः सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर या कार्यक्रमाचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्याने या सेलिब्रेशनचे वर्णन ‘अमेझिंग सेलिब्रेशन’ असे केले असून मल्ल्याचा उल्लेख ‘किंग ऑफ गुड टाइम्स’ असा केला आहे. ७० व्या वर्षात पदार्पण केल्याबद्दल मोदीने मल्ल्याला पुढील आयुष्यासाठी सुख आणि यशाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.
या पार्टीला जगाच्या कानाकोपऱ्यातून ललित मोदीचे मित्र आणि कुटुंबीय उपस्थित होते. पाहुण्यांच्या यादीत काही दिग्गज नावांचाही समावेश होता. किरण मुजुमदार-शॉ: बायोकॉनच्या (Biocon) संस्थापिका. इद्रिस एल्बा: हॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता. मनोविराज खोसला: नामांकित फॅशन डिझायनर. असं अनेक बडे लोक या पार्टीत उपस्थित होते.
An amazing celebration for my dear friend @TheVijayMallya at my house last night for all his friends and family who flew in from all corners of the world. Another cornerstone Achieved by the King of Goodtimes – his 70th birthday. Wish him all the happiness and success 🙏🏽 pic.twitter.com/x7FF2B70OB
— Lalit Kumar Modi (@LalitKModi) December 18, 2025
दरम्यान, भारतात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा करून फरार झालेले हे दोन दिग्गज परदेशात अशा प्रकारे आलिशान जीवन जगत असल्याचे पाहून भारतीय नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. “बँकांचे पैसे बुडवून हे लोक परदेशात मौजमजा करत आहेत,” अशा आशयाच्या कमेंट्सचा पाऊस पडत आहे. सोशल मीडियावर या दोघांनाही मोठ्या प्रमाणावर ‘ट्रोल’ केले जात आहे.
ललित मोदीकडून आभार प्रदर्शन :
ललित मोदीने या कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्या सर्व मित्रांचे आभार मानले आहेत. त्याने लिहिले, “माझ्या घरी आयोजित केलेल्या माझा मित्र विजय मल्ल्याच्या प्री-बर्थडे पार्टीसाठी आल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार.” असं तो म्हणतो. या व्हिडिओत अनेक बडे लोक असल्याचं दिसत आहे.





