इ साला कप नामदे! आरसीबीच्या विजयानंतर विजय माल्यांची पहिली प्रतिक्रिया; याचा अर्थ काय? जाणून घ्या…

Vijay Mallya | Siddharth Mallya | विराट कोहलीने १७ वर्षापासून उराशी बाळगलेलं स्वप्न काल पूर्ण झालं. २०२५ च्या इंडियन प्रीमियर लीगच्या जितेपदावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने मोहर उमटली. पंजाब किंग्सचा संघावर ६ धावांनी बंगळुरु संघाने विजय मिळवला. यानंतर देशभरात कोहलीच्या आणि आरसीबीच्या फॅन्सनी विजयी जल्लोष साजरा केला. दरम्यान, या विजयानंतर आरसीबीचे मालक उद्योजक विजय माल्या यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
माल्या सध्या आर्थिक घोटाळ्यांचे आरोप असल्याने देशाबाहेर आहेत. मागील अनेक वर्षांपासून त्यांनी भारतात पाऊलही ठेवलेलं नाही. मात्र, आरसीबीच्या विजयानंतर त्यांनी आपल्या भावना पोस्टच्या माध्यमातून व्यक्त केली. तर दुसरीकडे त्यांचा पुत्र सिद्धार्थ माल्याचा आरसीबीच्या विजयानंतरचा व्हिडीओ समोर आला आहे.
When I founded RCB it was my dream that the IPL trophy should come to Bengaluru. I had the privilege of picking the legendary King Kohli as a youngster and it is remarkable that he has stayed with RCB for 18 years. I also had the honour of picking Chris Gayle the Universe Boss…
— Vijay Mallya (@TheVijayMallya) June 3, 2025
अखेर १७ वर्षानंतर आरसीबीच्या संघाने आयपीएलचं जेतेपद पटकावलं. 2025 च्या संपूर्ण स्पर्धेत संघाची कामगिरी उत्तम राहिली. योग्य समतोल असलेला संघ चांगल्या प्रशिक्षणाखाली आणि सहाय्यकांच्या देखरेखीखाली छान खेळला. सर्वांचे अभिनंदन! इ साला कप नामदे! (या वर्षी कप आपण जिंकलो) असे म्हणत त्यांनी आनंद व्यक्त केला.
विराटचं कौतुक
मी जेव्हा आरसीबीचा पाया रचला होता, तेव्हा आयपीएलची ट्रॅाफी बंगळुरूमध्ये यावी अशी माझी फार इच्छा होती. त्यावेळी तरुण वयातील विराट कोहलीला निवडण्याची संधी मिळाली. मागील १७ वर्षांपासून तो आरसीबीसोबत राहिला हे फारच कौतुकास्पद आहे. मला युनिव्हर्सल बॅास ख्रिस गेल आणि मिस्टर ३६० एबी डिव्हिलिअर्स यांनाही निवडण्याची संधी मिळाली. ते आरसीबीच्या इतिहासातील अत्यंत महत्वाचे शिलेदार असल्याचे त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.
Victory celebration by Siddharth Mallya, son of Vijay Mallya, after RCB’s historic win🏆❤️ pic.twitter.com/tSn0VQiCb1
— Sree Harsha (@AapathBandhava) June 3, 2025
विजय मल्ल्या यांचा पुत्र सिद्धार्थ माल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओत टीव्हीवर आरसीबीच्या विजयाची दृश्य पाहताना तो भावूक झाल्याचे दिसत आहे. तब्बल १८ वर्षांनंतर आपण हे चित्र पाहतोय असे सिद्धार्थने व्हिडिओत म्हटले आहे.





