केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींना सांगून देश सोडला: परागंदा उद्योगपती विजय मल्ल्या याचा दावा; म्हणाला “६,२०० कोटींच्या बदल्यात…”

Vijay mallya : ९ वर्षांपूर्वी भारतातून परदेशात गेलल्या उद्योगपती विजय माल्या याने मोठा दावा केला आहे. मी पळपुटा नाही, तत्कालीन केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींना सांगून देश सोडला, असल्याचा दावा त्याने केला आहे. तसेच बँकांसोबत तडजोड करण्याचा विचार करत असतानाच पासपोर्ट रद्द झाला आणि परदेशात अडकल्याचेही त्याने सांगितले. यूट्यूबर राज शमानी याच्यासोबत झालेल्या पॅाडकास्टमधून ही माहिती समोर आली आहे. त्याने केलेल्या दाव्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
मला चोर म्हणणे चुकीचे आहे. कारण ६,२०० कोटींच्या बदल्यात बँकांनी १४ हजार कोटी वसूल केले आहेत, असा देखील दावा त्याने या पॅाडकास्टमधून केला आहे. ९ वर्षांनंतर प्रथम माल्यांनी या प्रकराणाबाबत आपले म्हणणे मांडत सविस्तर चर्चा केली. विजय मल्ल्या याच्यावर ६,२०० कोटी रुपयांच्या बँक कर्ज फसवणूक आणि मनी लाँड्रिंगचा आरोप ठेवण्यात आला आहे. माझा कायदेशीर लढा सुरू असून जर मला न्याय्य सुनावणी मिळाली, तर भारतात परतण्याचा विचार करेन, असे विधान त्याने केले आहे.
२०१६ मध्ये मल्ल्यांनी भारत सोडून पदेशात पलायन केले. सध्या माल्या लंडनमध्ये स्थित असून त्याचे उपत्न विदेशी दारू कंपन्यांमधून येते, असे त्याने सांगितले. विजय माल्ल्या २ मार्च २०१६ रोजी बैठकीसाठी लंडनला गेले. तिथे मी अरुण जेटलींना सांगितले होते की मी जात आहे. पण पासपोर्ट रद्द झाल्यामुळे इथे अडकलो. मी भगोडा नाही. ही काही पळून जाण्याची योजना नव्हती, असे त्याने सांगितले होते. यामुळे मला चोर म्हणणे चुकीचे आहे, असे देखील माल्या म्हणाले.
हेही वाचाः “तोकडे कपडे घालणाऱ्या महिला आवडत नाही, सेल्फी काढण्यास….”; भाजप नेत्याचे वादग्रस्त विधान





