Sara Ali Khan: सारा अली खानने केला मदतीचा प्रयत्न, सोशल मीडियावर मात्र झाली ट्रोल; नेमकं काय घडलं?

Sara Ali Khan: बॉलीवूड अभिनेत्री सारा अली खान पुन्हा एकदा सोशल मीडियावर ट्रोलिंगची शिकार ठरली आहे. यावेळी तिने एका अपंग व्यक्तीला मदत करण्याचा प्रयत्न केला, पण हा प्रयत्न ना त्या व्यक्तीला पसंत पडला, ना सोशल मीडिया यूजर्सना.
व्हिडिओ व्हायरल: सारा देतेय बिस्किटाचे पॅकेट्स
सोशल मीडियावर सारा अली खानचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओत ती स्वतःच्या कारचं दार उघडून रस्त्यावर बसलेल्या एका अपंग व्यक्तीला दोन बिस्किटांचे पॅकेट देण्याचा प्रयत्न करते. मात्र, तो व्यक्ती बिस्किट घेण्यास नकार देतो. ते पाहून सारा पॅकेट्स परत कारमध्ये ठेवते, दार बंद करते आणि पुढे निघून जाते.
View this post on Instagram
यूजर्सकडून ट्रोलिंग
साराच्या या कृतीवर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
काही जण म्हणाले, “प्रत्येकजण भीक मागत नाही; काहींची परिस्थिती वेगळी असते.” “अशी मदत म्हणजे इज्जत घालवण्यासारखं आहे.” तर काहींनी थेट सारा अली खानचीच बेइज्जती झाली असे म्हणत तिला ट्रोल केले.
करिअर फ्रंटवर सारा
या वर्षी सारा ‘मेट्रो… इन दिनों’ या चित्रपटात दिसली होती, आणि तिच्या अभिनयाचं कौतुकही झालं होतं. आगामी वर्षात ती ‘पति पत्नी और वो 2’ या चित्रपटात झळकणार आहे.
एका चांगल्या उद्देशाने मदत करण्याचा प्रयत्न असला तरी, सोशल मीडियावर साऱ्याच गोष्टी लोकांना पटतात असं नाही. सारा अली खानचा हा छोटासा प्रयत्न मात्र मोठ्या ट्रोलिंगमध्ये बदलला आहे.





