Vidyanand Bapat: गणेशोत्सवातील ‘डीजे’विरोधात उठवला आवाज; पुण्यात विद्यानंद बापट यांना मारहाण
Vidyanand Bapat: गणेश मंडळाच्या काही कार्यकर्त्यांनी बापट यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप

Vidyanand Bapat : गणेशोत्सवातील डीजेच्या वापराविरोधात भूमिका घेतल्यामुळे चर्चेत आलेले विद्यानंद बापट यांना पुण्यातील टिळक रोडवरील कशाळे चौकात बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गणेश मंडळाच्या काही कार्यकर्त्यांनी बापट यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे.
विद्यानंद बापट यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे धार्मिक संघटना, डीजेप्रेमी आणि ढोलवादक पथकातील अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती.
विद्यानंद बापट यांनी यापूर्वी पुणे महानगरपालिकेच्या सभेत डीजेला विरोध केला होता. तेव्हाही गणेश मंडळांचे प्रतिनिधी आणि राजकीय व्यक्तींनी बापट यांना विरोध केला होता. (Vidyanand Bapat )
तेव्हा देखील बापट यांना पालिकेच्या सुरक्षारक्षकांनी बंदोबस्तात बाहेर काढले होते. आता थेट त्यांच्यावर पुण्यात टिळक रोड येथील कशाळे चौकात मारहाण करण्यात आली आहे.
नेमकं काय घडलं? (Vidyanand Bapat )
विद्यानंद बापट हे एका वृत्तवाहिनीला मुलाखत देत असताना त्यांच्यावर एका व्यक्तीने हल्ला केला. मात्र, त्याठिकाणी पोलीस आणि इतरजण उपस्थित असल्याने पुढील अनर्थ टळला. मात्र, या हल्ल्यानंतर विद्यानंद बापट डगमगले नाहीत. त्यांनी या हल्ल्यानंतर प्रसारमाध्यमांना शांतपणे प्रतिक्रिया देत, माझी भूमिका योग्य आहे, हे मला माहिती आहे. मी त्यावर ठाम राहणार असल्याचे सांगितले.
दरम्यान, या हल्ल्याच्या घटनेनंतर पुणे पोलिसांनी हल्लेखोराला ताब्यात घेऊन पुढील तपास सुरु आहे. विद्यानंद बापट यांच्यावर हल्ला करणारी व्यक्ती कोण होती, हे अद्याप समोर आलेले नाही. मात्र, पोलीस आता या व्यक्तीवर कोणती कारवाई करणार, याकडे अनेकांचे लक्ष राहणार आहे. Vidyanand Bapat
हेही वाचा:






