Bacchu Kadu : बच्चू कडू यांच्यासह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल; नेमकं काय आहे प्रकरण?
Bacchu Kadu : १५ किलोमीटरचा पायी प्रवास करत बच्चू कडू यांनी काढला होता मोर्चा

Bacchu Kadu : शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि आमदार बच्चू कडू यांच्यासह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनापरवानगी आंदोलन व पोलिसांवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.
विनापरवानगी पायदळ मार्च काढणे, बेकायदेशीर जमाव जमविणे तसेच भाषणातून पोलिसांना शिवीगाळ आणि तहसीलदारांना पुलाखाली फेकण्याची धमकी दिल्याच्या आरोप बच्चू कडू यांच्यावर करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी त्यांच्याविरोधात कारवाई केली.
बच्चू कडू यांच्यासह ६ जणांविरोधात घुग्घूस पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या सर्वांविरोधात बीएनएस २०२३ मधील कलम १९०, १९१(२) २९६, २२३, २२४, ३५१ (२) तसंच महाराष्ट्र पोलिस अधिनियम, १९५१ च्या कलम १३५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
Shirur News : पिस्तुलाचा धाक, गोळीबार अन् अवैध धंद्यांचे आव्हान; शिरूरमध्ये गुन्हे शाखेत फेरबदल
स्थानिक भूमिपुत्रांना वेकोलिमध्ये 80 टक्के नोकऱ्यांमध्ये प्राधान्य मिळावे यासह इतर मागण्यांसाठी बच्चू कडू यांनी 18 तारखेला मोर्चा आयोजित केला होता. यवतमाळ जिल्ह्यातील पैनगंगा पुलावरून त्यांनी मोर्चा काढला होता.
या मोर्चाची घुग्गुस शहरातील कारगिल चौकात सांगता झाली. जवळपास १५ किलोमीटरचा पायी प्रवास करत बच्चू कडू यांनी हा मोर्चा पूर्ण केला. या मोर्चादरम्यान विनापरवानगी आंदोलन व पोलिसांवर आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. प्रकल्पग्रस्त आंदोलकांना पोलिस त्रास देत असल्याचा आरोप करत बच्चू कडू यांनी पोलिसांवर खालच्या पातळीवर टीका केली होती
आमदार बच्चू कडू यांच्यासह शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा संघटक मुकेश जिवतोडे, रोशन राजाराम हरबडे, अमोल नथ्थूजी मांढरे, नथ्थू भाऊराव नवले आणि सतीश बीडकर यांच्याविरुद्ध हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
हेही वाचा:





