Bhor News : आपटी येथे 6 वर्षीय चिमुकल्यावर रानडुकराचा भीषण हल्ला! ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे वाचला जीव
पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील (Bhor News) आपटी येथे सहा वर्षीय बालकावर रानडुकराने अचानक भीषण हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. शार्दूल हर्षल पारठे असे या जखमी बालकाचे नाव आहे.

Bhor News : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील (Bhor News) आपटी येथे सहा वर्षीय बालकावर रानडुकराने अचानक भीषण हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. शार्दूल हर्षल पारठे असे या जखमी बालकाचे नाव असून, या हल्ल्यात तो जखमी झाला आहे. गावात ग्रामस्थ उपस्थित असतानाच रानडुकराने अचानक हल्ला केल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
या घटनेत (Bhor News) शार्दूल जखमी झाल्यानंतर ग्रामस्थांनी तातडीने धाव घेत त्याला मदत केली. त्यानंतर त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे बालकाला वेळीच मदत मिळाली. या घटनेमुळे गावातील नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी आपटी येथे भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. सहाय्यक वनसंरक्षक शीतल राठोड यांच्या सूचनेनुसार वनपरिक्षेत्र अधिकारी शिवाजी राऊत आणि वनपरिमंडळ अधिकारी रोहन इंगवले यांनी घटनास्थळी भेट दिली.
या भेटीदरम्यान माजी सरपंच शंकर पारठे, अंकुश पारठे आणि जगन्नाथ पारठे उपस्थित होते. यावेळी घटनेबाबत माहिती घेण्यात आली असून,वनविभागाकडून पुढील कार्यवाही सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.
गावात नागरिकांची वर्दळ असतानाही रानडुकराने बालकावर हल्ला केल्याने वन्यप्राण्यांच्या (Bhor News) वावराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अशा घटना टाळण्यासाठी वनविभागाने आवश्यक उपाययोजना कराव्यात आणि नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.






