Anna Hazare : अण्णा हजारेंचे मौन आंदोलन; जंतरमंतरवरील विद्यार्थांच्या समर्थनासाठी उतरले मैदानात
Anna Hazare : अण्णा हजारे आंदोलनस्थळी भावुक

Anna Hazare : दिल्ली येथील जंतर मंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांना पाठिंबा देण्यासाठी देशभरातून अनेक दिग्गज मंडळींनी पाठिंबा दिला आहे. यादरम्यान ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही विद्यार्थांना पाठिंबा देण्यासाठी मौन आंदोलन सुरु केलं आहे.
अहिल्यानगरच्या वाडिया पार्क येथील महात्मा गांधी यांच्या स्मारकाजवळ मौन आंदोलन स्थळी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे दाखल झाले असून, यावेळी ते भावुक झाल्याचे पाहायला मिळाले.
आज दुपारी साडेबाराच्या सुमारास अण्णा हजारे यांचे राळेगणसिद्धी येथून नगरला आगमन झाले. भारतमातेचे पूजन करून त्यांनी मौन व्रत स्वीकारले. या आंदोलस्थळाला ‘नगरचे जंतर मंतर’ असे नामकरण करण्यात आले आहे.
अण्णा हजारेंचे मोदींना पत्र (Anna Hazare)
एकीकडे नवी दिल्लीसह देशातील विविध शहरांमध्ये सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवले आहे. यात त्यांनी आंदोलनादरम्यान घडलेल्या हिंसाचाराच्या आणि पोलिसी कारवाई अत्यंत वेदनादायक असल्याचे नमूद केले आहे.
‘आज देशातील लाखो तरुण पेपरफुटी, भरती प्रक्रियेतील विलंब, बेरोजगारी आणि इतर अनेक प्रश्नांमुळे अस्वस्थ आहेत. या अस्वस्थतेकडे केवळ कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न म्हणून न पाहता, ती समाजातील वेदना आणि अपेक्षा म्हणून समजून घेणे आवश्यक आहे. 22 मुलांनी निराश होऊन आत्महत्या केल्या. फेर परीक्षेच्या निकालांमध्ये मोठा गोंधळ झाला असल्याच्या बातम्या आहे. सरकारी कारभारामध्ये काही गैरकारभार उघडकीस आला की त्याची जबाबदारी खालच्या माणसांवर टाकायची आणि चांगलं जे असेल त्याच श्रेय सरकारने घ्यायचं हे योग्य नाही. वरिष्ठांची जनतेप्रती जबाबदारी व उत्तरदायित्व आहे,” असे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.

Anna Hazare : अण्णा हजारेंचे मौन आंदोलन; जंतरमंतरवरील विद्यार्थांच्या समर्थनासाठी उतरले मैदानात
दरम्यान, अण्णा हजारे सहा वर्षानंतर मौन आंदोलन केले आहे. यापूर्वी सन २०१९ मध्ये त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राळेगणसिद्धी येथे मौन आंदोलन केले होते. काही दिवसांपूर्वी माहिती अधिकार कायद्याच्या नियमावलीमध्ये राज्य सरकारने जाचक बदल केले याकडे लक्ष वेधत त्या नियमावली मागे घ्याव्यात या मागणीसाठी उपोषणाचा इशारा दिला होता. मात्र त्यांचे आंदोलन सुरू होण्यापूर्वीच, दोन दिवस आधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निमावलीला स्थगिती दिल्याने हजारे यांनी आंदोलन स्थगित केले होते. त्यानंतर मागील अनेक वर्षांपासून अण्णा हजारे कोणत्याही आंदोलनाच्या व्यासपीठावर दिसले नाही. आता दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.
हेही वाचा:





