Abhijit Deepke : अभिजित दीपकेंची तब्येत बिघडली; आंदोलकांना केले आवाहन
Abhijit Deepke : सीजेपी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा

Abhijit Deepke : राजधानी दिल्लीतील जंतर मंतर येथे नीट (NEET) परीक्षेतील अनियमिततेवरून कॉकरोच जनता पक्षाने (CJP) सुरू केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अभिजित दीपके यांची तब्येत खराब झाली आहे. याबाबत त्यांनी आंदोलकांना एक आवाहन केले आहे.
त्यांनी ‘एक्स’ (ट्विटर) वर लिहिले की, “मला गेल्या काही दिवसांपासून ताप आणि अंगदुखी आहे, पण पेनकिलर घेऊन काम चालले आहे. जर आज मी जंतर-मंतरवर दिसलो नाही तर माफ करा. मला बरे वाटण्यासाठी काही तास विश्रांतीची गरज आहे. संध्याकाळपर्यंत मी आंदोलनाच्या ठिकाणी परत येईन.” याद्वारे दिपकेंनी आजारी असूनही संघर्ष सुरुच राहणार असल्याचा विश्वासही आंदोलकांना दिला आहे. (Abhijit Deepke)
I’ve been down with a fever and severe body pain for the last few days, but I’ve been pushing through with painkillers.
My apologies if you don’t see me at Jantar Mantar today. I need to get a few hours of rest and recover.
Will be back at the protest site by evening.
— Abhijeet Dipke (@abhijeet_dipke) July 23, 2026
पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा (Abhijit Deepke)
दुसरीकडे, देशभरात सुरू असलेल्या सीजेपी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी एक मोठी घोषणा केली आहे. . त्यांनी या प्रकरणात दोषींना कठोर आणि लवकरात लवकर शिक्षा मिळणार असल्याचे आश्वासन दिले आहे. “पेपरफुटीत सहभागी असलेल्यांना जलद आणि कठोर शिक्षा सुनिश्चित करण्यासाठी आम्ही जलदगती न्यायालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात सर्व आवश्यक पावले उचलण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत,” असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले आहे. (Abhijit Deepke)
पुढे पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, “विद्यार्थ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी उचलल्या जात असलेल्या पावलांच्या मालिकेचा हा एक भाग आहे. जो कोणी आपल्या तरुणांच्या भविष्याला हानी पोहोचवण्याचा प्रयत्न करेल, त्याला सोडले जाणार नाही,” याद्वारे पंतप्रधान मोदींनी पेपरफुटीसाठी जबाबदार असलेल्यांना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही, असे स्पष्ट केले आहे. यावर अभिजित दिपकेंनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा फोटो शेअर करत ‘ Hi my name is Nothing’ असे म्हणत खोचक टोला लगावला आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून नीट परीक्षेच्या पेपरफुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. मात्र अद्याप यावर सरकारकडून कोणाताही निर्णय घेण्यात आलेला नाही.
हेही वाचा:
Baramati News : बारामतीत दिवंगत लोकनेते अजितदादा पवार यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण





