Sonia Sehrawat: ‘कॉकरोच कधी मरत नाहीत…’! महिला आरएएफ अधिकाऱ्याच्या ‘त्या’ इन्स्टास्टोरीमुळे खळबळ ; कोण आहेतसोनिया सेहरावत ?
Sonia Sehrawat: दिल्लीत सुरू असलेल्या झुरळ जनता पक्षाच्या (CJP) निदर्शनांदरम्यान, रॅपिड ॲक्शन फोर्स (RAF) अधिकारी सोनिया सेहरावत चर्चेचा विषय बनल्या आहेत.

Sonia Sehrawat: दिल्लीत सुरू असलेल्या झुरळ जनता पक्षाच्या (CJP) निदर्शनांदरम्यान, रॅपिड ॲक्शन फोर्स (RAF) अधिकारी सोनिया सेहरावत चर्चेचा विषय बनल्या आहेत.
संसदेच्या मोर्चाच्या एका दिवसानंतर त्यांनी एक इंस्टाग्राम स्टोरी पोस्ट केल्यामुळे त्याच्याबद्दल गोंधळ उडाला आहे. त्यांच्या स्टोरीचा स्क्रीनशॉट सध्या सगळीकडे व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये आंदोलकांचा अपमान होताना दिसत आहे. 20 जुलै रोजी संसदेच्या मोर्चाच्या दिवशीही सेहरावत जंतरमंतरवर उपस्थित होते.
समोर आलेल्या माहितीनुसार, सेहरावतने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक छोटी रील पोस्ट केली होती, जी नंतर काढून टाकण्यात आली. ‘जे स्वतःला दुरुस्त करू शकत नाही आणि त्यांना देशाला दुरुस्त करायचा आहे’, असे या स्टोरीत लिहिले होते. सीजेपींनी या कथित पोस्टवर तीव्र टीका केली. सेहरावत यांनी आंदोलकांची चेष्टा केल्याचा आणि सुरक्षा दलांच्या क्रूरतेचे समर्थन केल्याचा आरोप केला.
सीजेपी यांनी एका पोस्टमध्ये,”हे आरएएफ अधिकारी शांततापूर्ण आंदोलकांना चक्क झुरळे समजतो आणि म्हणूनच पोलिसांची क्रूरता योग्य होती असे त्याला वाटते, पण बघा, आम्ही झुरळेच आहोत आणि झुरळे कधीच मरत नाहीत”असे त्यांनी म्हटले आहे
महुआ मोईत्रा काय म्हणाल्या ? Sonia Sehrawat:
टीएमसी खासदार महुआ मोईत्रा यांनीही यावर टीका केली. सोशल मीडियावर त्या पोस्टच्या स्क्रीनशॉट शेअर करताना त्यांनी, “RAF असिस्टंट कमांडंट सोनिया सेहरावत यांचे इन्स्टा प्रोफाइल आमच्या मुलांना (निदर्शकांना) झुरळ म्हणत आहे.”असे म्हटले आहे.
RAF assistant commandant Sonia Shehrawat’s insta profile calling our children protestors cockroaches. Let’s find out who she is, where she lives, what’s her record? Let’s name & shame & drag each of these zealots through the law pic.twitter.com/RzXnXjfDMW
— Mahua Moitra (@MahuaMoitra) July 22, 2026
अभिजित दिपके यांनी प्रश्न उपस्थित केला होता? Sonia Sehrawat:
20 जुलै रोजी आयोजित संसद चलो मार्चच्या दिवशी, CJP संस्थापक अभिजित दिपके यांनी सोनिया सेहरावत यांच्याबद्दल प्रश्न उपस्थित केला होता की आरएएफच्या जवानांनी आंदोलकांवर, विशेषत: महिलांवर बळाचा वापर केला होता.
एका लॉरीवर उभं राहून दिपके यांनी अधिकाऱ्याला प्रश्न विचारला, “मॅडम, एक महिला असल्याने मला हे जाणून घ्यायचं आहे की तुम्ही पुरुषांकडून महिलांवर केल्या जाणाऱ्या क्रौर्याचं समर्थन करता का?”
सुरक्षा कर्मचाऱ्यांवर प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप करणाऱ्या महिला आंदोलकाचा संदर्भ देत दिपके म्हणाले की, मुलीने तिच्यावर प्राणघातक हल्ला करून छातीवर मारल्याचे सांगितले होते. हे बरोबर आहे का?






