Congress Leader : भीषण अपघातात काँग्रेसच्या दिग्गज नेत्याचा मृत्यू; राजकीय वर्तुळात हळहळ
Congress Leader : बनापूरचे माजी जिल्हाध्यक्ष बुचा उपाध्याय यांचा भीषण रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

Congress Leader : बिहारमधील बक्सर जिल्ह्यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि बनापुरचे माजी जिल्हाध्यक्ष बुचा उपाध्याय (रवींद्रनाथ उपाध्याय) यांचा भीषण रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेमुळे जिल्ह्यात शोककळा पसरली असून राजकीय वर्तुळातून हळहळ व्यक्त केली जात आहे. (Congress Leader)
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी बुचा उपाध्याय हे मोटारसायकलवरून चौसाकडे जात होते. बक्सर-कोचस महामार्गावरील मिश्रवलिया गावाजवळ अचानक एक गाय वेगाने रस्त्यावर आली आणि त्यांच्या दुचाकीला धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की ते रस्त्यावर फेकले गेले आणि त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. (Congress Leader)
स्थानिक नागरिकांनी तत्काळ त्यांना चौसा येथील आरोग्य केंद्रात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी सदर रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. (Congress Leader)
खिलाफतपुर येथील वॉर्ड क्रमांक १२ चे रहिवासी असलेले बुचा उपाध्याय हे स्वर्गीय राजकिशोर उपाध्याय यांचे पुत्र होते. साधा, नम्र स्वभाव आणि जनसंपर्कामुळे ते परिसरात ‘बाबा’ म्हणून ओळखले जात होते. त्यांनी काँग्रेस पक्षात विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या होत्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही सक्रिय भूमिका बजावली होती. (Congress Leader)

त्यांच्या निधनाची बातमी समजताच चौसा नगर पंचायतसह संपूर्ण बक्सर जिल्ह्यात शोक व्यक्त करण्यात आला. अनेक राजकीय नेते, कार्यकर्ते आणि नागरिकांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली असून त्यांच्या निधनामुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. (Congress Leader)
Congress Leader Died : काँग्रेसच्या ‘या’ दिग्गज नेत्याचे निधन; राजकीय वर्तुळात शोककळा
Congress Leader : काँग्रेस नेत्यावर भररस्त्यात गोळीबार; राजकीय वर्तुळात खळबळ





