Congress Leader : काँग्रेस नेत्यावर भररस्त्यात गोळीबार; राजकीय वर्तुळात खळबळ
Congress Leader : काँग्रेस नेते हल्के राजा यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी ६ ते ७ गोळ्या झाडून जीवघेणा हल्ला केला आहे.

Congress Leader : मध्यप्रदेश मधील छतपूर जिल्ह्यात काँग्रेस नेत्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यामुळे खळबळ उडाली आहे. निवडणुकीतील वाद आणि जुन्या वैमनस्यातून हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. (Congress Leader)
मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेस नेते महूम सिंह बुंदेा उर्फ हल्के राजा यांच्यावर इमलिया तिराहा परिसरात अज्ञात हल्लेखोरांनी अंधाधुंद गोळीबार केला. हल्लेखोरांनी त्यांच्या कारला अडवून 6 ते 7 राऊंड गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात हल्के राजा गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलं जात आहे. (Congress Leader)
ही घटना राजनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विक्रमपूर गावाजवळ घडली. जखमी नेत्याचे भाचे अभय राज सिंह बुंदेला यांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्के राजा हे छतरपूरहून आपल्या गावी जात होते. त्यावेळी दोन ते तीन वाहनांमधून आलेल्या 7 ते 8 हल्लेखोरांनी त्यांच्या कारला घेराव घातला. (Congress Leader)
गोळीबारानंतर हल्लेखोरांनी बेसबॉल बॅटनेही त्यांच्यावर हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं असून राजकीय वर्तुळातही मोठी खळबळ उडाली आहे. (Congress Leader)





