CJP Protest : अभिजीत दीपके आणि टीमला अटक होणार? दीपकेंच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
CJP Protest : दिल्लीतील जंतर-मंतर येथे 'नीट' (NEET) पेपरफुटीप्रकरणी सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाने आता अत्यंत नाट्यमय वळण घेतले आहे.

CJP Protest : दिल्लीतील जंतर-मंतरवर सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला नवे वळण मिळाले आहे. कॉक्रोच जनता पार्टी (CJP)चे संस्थापक अभिजीत दीपके यांनी आपल्या टीमला आज अटक होण्याची शक्यता असल्याचा दावा केला आहे. या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. (CJP Protest)
दरम्यान, २८ जूनपासून उपोषणावर असलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी शुक्रवारी आपले उपोषण मागे घेतले. मध्यरात्री केंद्र सरकारच्या प्रतिनिधींशी झालेल्या चर्चेनंतर त्यांनी हा निर्णय घेतला. मात्र, अभिजीत दीपके यांनी स्पष्ट केले की, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याशिवाय जंतर-मंतरवरील आंदोलन मागे घेतले जाणार नाही. (CJP Protest)
अभिजीत दीपके म्हणाले, “आमच्या टीमला आज संध्याकाळी अटक होऊ शकते, अशी माहिती मिळाली आहे. आम्ही गेल्या ३५ दिवसांपासून शांततापूर्ण आंदोलन करत आहोत. स्वतंत्र भारतात इतक्या शांततेने आंदोलन झालेले क्वचितच पाहायला मिळेल. आम्ही महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संविधानाच्या मार्गावर चालणारे आहोत. मग आम्हाला अटक करण्याचे कारण काय?” (CJP Protest)
अभिजित दीपके यांनी समर्थकांना कोणत्याही परिस्थितीत शांतता राखण्याचे आवाहन करत आंदोलन अहिंसक पद्धतीने सुरू ठेवण्याचे आवाहन केले. तसेच सरन्यायाधीश आणि सरकारी प्रतिनिधी यांच्यात होणाऱ्या बैठकीपूर्वीच अटकेची शक्यता व्यक्त केल्याने या दाव्याकडे विशेष लक्ष वेधले जात आहे. (CJP Protest)
केंद्रीय मंत्र्यांसोबतच्या चर्चेबाबत बोलताना दीपके यांनी सांगितले की, बैठक तटस्थ ठिकाणी होणार असून धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याशिवाय अन्य कोणताही पर्याय स्वीकारला जाणार नाही. त्यांनी सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडल्याबद्दल समाधान व्यक्त करत, “त्यांचे आयुष्य देशासाठी महत्त्वाचे आहे,” असेही म्हटले. (CJP Protest)
दरम्यान, अभिजीत दीपके यांनी व्यक्त केलेल्या अटकेच्या शक्यतेबाबत अधिकृतरीत्या पोलिसांकडून किंवा प्रशासनाकडून कोणतीही पुष्टी करण्यात आलेली नाही. त्यामुळे त्यांच्या दाव्याची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही. (CJP Protest)
CJP Protest : आंदोलक विद्यार्थ्यांवरील खोटे गुन्हे मागे घ्या; निवेदन सादर करत काँग्रेस पक्षाची मागणी






