Rahul Gandhi : १० वर्षांत १५२ पेपर लीक; तरुणांचे भविष्य धोक्यात : राहुल गांधी
Rahul Gandhi : दिल्लीत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलीस कारवाईनंतर देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर अत्यंत आक्रमक शब्दांत हल्लाबोल केला आहे.

Rahul Gandhi : विद्यार्थी शांततेने आंदोलन करत असताना सुरक्षा दलांनी विद्यार्थ्यांना निर्दयपणे मारहाण केली. धर्मेंद्र प्रधान यांनी देशाची शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त केली आहे. गेल्या 10 वर्षांत 152 परीक्षांचे पेपर लीक झाले आहेत. (Rahul Gandhi)
वारंवार होणाऱ्या पेपरफुटीच्या घटनांमुळे लाखो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आणि व्यावसायिक भविष्य धोक्यात आले आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केला. (Rahul Gandhi)
नवी दिल्लीतील काँग्रेस मुख्यालय इंदिरा भवन येथे राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. पत्रकार परिषदेला सुरुवात करण्यापूर्वी त्यांनी विद्यार्थ्यांवरील पोलिसांच्या लाठीमाराचा व्हिडिओ दाखवला. (Rahul Gandhi)
राहुल गांधी म्हणाले, आज भारतात शिक्षण इतके महाग झाले आहे की मध्यमवर्गाला प्रगती करता येत नाही. सरकारी नोकऱ्यांच्या नावाखाली विद्यार्थ्यांकडून कोट्यवधी रुपये घेतले जातात आणि जे 40-50 लाख रुपये भरतात त्यांना चोरवाटेने नोकरी दिली जाते. (Rahul Gandhi)
आज विद्यार्थ्यांना आपली फसवणूक झाल्यासारखे वाटते. विद्यार्थी सिस्टिममध्ये सुधारणांची मागणी करत आहेत. 152 पेपरफुटी प्रकरणात एकालाही शिक्षा झालेली नाही. तरुणांमध्ये व्यवस्थेविरोधात संताप आहे. शिक्षण व्यवस्थेकडे लक्ष देण्याची गरज आहे. (Rahul Gandhi)
देशाातील अनेक विद्यार्थी प्रचंड मानसिक तणावाखाली आहेत. परीक्षेच्या अगोदरच पेपरफुटीसारख्या घटना घडत असल्याने त्यांच्या भविष्यावर गंभीर परिणाम होत आहेत. याशिवाय, या परिस्थितीमुळे काही विद्यार्थ्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहे. (Rahul Gandhi)
देशातील शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त झाली आहे. सरकार विद्यार्थ्यांप्रति संवेदनशील नाही. नीट परीक्षेवरील खर्च शिक्षण अर्थसंकल्पाएवढाच आहे. विद्यार्थी नीट परीक्षेवर 1.32 लाख कोटी रुपये खर्च करत आहेत. (Rahul Gandhi)
सरकारच्या अपयशी धोरणांमुळे देशाची शिक्षण व्यवस्था कमकुवत झाली असून परीक्षा प्रक्रियेवरील विश्वास कमी झाला आहे. तरुणांना न्याय देण्याऐवजी त्यांच्या भविष्याशी खेळ केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. (Rahul Gandhi)
दरम्यान, राहुल गांधी यांनी परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता, पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर यंत्रणा आणि दोषींवर कडक कारवाई करण्याची गरज व्यक्त केली. त्यांच्या या वक्तव्यानंतर पेपरफुटीचा मुद्दा पुन्हा एकदा राष्ट्रीय राजकारणाच्या केंद्रस्थानी आला असून, शिक्षण व्यवस्था आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत चर्चा सुरू झाली आहे. (Rahul Gandhi)
तीन मागण्या
– धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा.
– विद्यार्थ्यांवर अत्याचार करणाऱ्यांवर कठोर कारवाई
– पंतप्रधान मोदींनी विद्यार्थ्यांची माफी मागावी
Rahul Gandhi : तीन तासांनंतर राहुल गांधी, प्रियंका गांधींची सुटका, काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक






