Congress Leader Died : काँग्रेसच्या ‘या’ दिग्गज नेत्याचे निधन; राजकीय वर्तुळात शोककळा
उत्तराखंडची राजधानी देहरादूनमध्ये काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नियोजित दौऱ्यापूर्वी एक अत्यंत धक्कादायक आणि मोठी दुर्घटना (Congress Leader Died) घडली आहे.

Congress Leader Died : उत्तराखंडची राजधानी देहरादूनमध्ये काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नियोजित दौऱ्यापूर्वी एक अत्यंत धक्कादायक आणि मोठी दुर्घटना (Congress Leader Died) घडली आहे.
राहुल गांधी यांच्या स्वागतासाठी आणि कार्यक्रमाच्या पूर्वतयारीमध्ये व्यस्त असलेले काँग्रेसचे स्थानिक नेते अमर मेहता यांचा एका अपघातात दुर्दैवी मृत्यू (Congress Leader Died) झाला आहे. या घटनेमुळे काँग्रेस कार्यकर्त्यांवर शोककळा पसरली असून, कार्यक्रमस्थळी एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, देहरादूनमधील बन्नू शाळेच्या मैदानावर १७ जुलै रोजी काँग्रेस पक्षाच्या वतीने ‘तरुणांचा आवाज’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या भव्य तयारीची जबाबदारी अमर मेहता यांच्यावर (Congress Leader Died) होती आणि ते स्वतः मैदानावर उपस्थित राहून काम करून घेत होते.
गुरुवारी रात्री कार्यक्रमस्थळी स्टेज आणि मंडप उभारण्याचे काम वेगाने सुरू असताना, अचानक एक वजनदार लोखंडी पाईप थेट अमर मेहता यांच्या डोक्यावर कोसळला. हा आघात एवढा भीषण होता की मेहता जागीच रक्ताच्या थारोळ्यात पडले आणि गंभीर जखमी झाले.
तिथे उपस्थित असलेल्या इतर कार्यकर्त्यांनी आणि मजुरांनी तात्काळ त्यांना जखमी अवस्थेत जवळच्या एका खाजगी रुग्णालयात नेले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. डॉक्टरांनी तपासणी अंती त्यांना मृत घोषित केले.
या अपघाताची माहिती मिळताच पोलीस प्रशासन आणि बचाव पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तसेच काँग्रेसच्या अनेक वरिष्ठ नेत्यांनीही रुग्णालयात आणि मैदानावर धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला. पोलिसांनी सध्या कार्यक्रमस्थळचे बांधकाम तात्पुरत्या स्वरूपात थांबवले आहे.
विशेष म्हणजे, ‘तरुणांचा आवाज’ हा कार्यक्रम सुरुवातीला देहरादूनमधील दुसऱ्या एका मैदानावर होणार होता, परंतु प्रशासकीय परवानगीच्या वादानंतर ऐनवेळी या कार्यक्रमाचे ठिकाण बदलून ते बन्नू शाळेच्या मैदानावर निश्चित करण्यात आले. त्यामुळे अतिशय कमी वेळेत हे नियोजन पूर्ण करण्याचे मोठे आव्हान आयोजकांसमोर होते.
कार्यक्रमाच्या आदल्या दिवशीच घडलेल्या या भीषण अपघातामुळे (Congress Leader Died) आता कार्यक्रमाच्या आयोजनावर आणि तेथील सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. मंच उभारणीचे काम सुरू असताना कामगारांच्या आणि नेत्यांच्या सुरक्षेचे नियम पाळले गेले होते का, या दृष्टिकोनातून पोलिसांनी आता सखोल चौकशी सुरू केली आहे.






