श्रीगोंदा -तालुक्यातील एरंडोली येथील वीरपुत्र सुभेदार ज्ञानेश्वर सखाराम मोरे यांना रविवारी (दि.27) सायंकाळी वीरमरण आले. ते सियाचीन येथे मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये देशसेवा बजावत होते. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी (१ मार्च) ला सकाळी त्यांच्या गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
शहीद मोरे यांनी मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये 18 वर्षे सेवा पूर्ण केली होती. त्यानंतर दोन वर्ष अधिकची सेवा करून, पुन्हा सहा महिने ते सेवेत होते. यादरम्यान देशसेवा करत असताना त्यांना वीरमरण आले. तीन महिन्यांपूर्वी त्यांना लष्करी जवानांच्या हेलिकॉप्टरचा तुकडा उडून लागला होता. जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर मेंदूत गाठ तयार झाली. बंगलोर येथे उपचार चालू असताना त्यांना वीरत्व आले. त्यांचे पार्थिव त्यांच्या गावी एरंडोली येथे आणले जाणार असून त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी (१ मार्च) ला सकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या मागे वडील सखाराम मोरे, आई सुलाबाई, पत्नी सुरेखा, मुलगा महेश, मुलगी अर्पिता मोरे असा परिवार आहे.