Varsha Usgaonkar : वर्षा उसगावकर अन् अशोक सराफ या मालिकेतून दिसणार एकत्र, सेटवरचा फोटो समोर

Varsha Usgaonkar : अशोक सराफ आणि वर्षा उसगावकर या दोन्ही कलाकांरांनी मराठी सिनेसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात आपलं अढळ स्थान निर्माण केलं आहे. वर्षा उसगावकर नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे नेहमी चर्चेत असतात. त्यांना वर्षा ताई, तर अशोक सराफ यांना अशोक मामा या नावानं हाक दिली जाते. आता हे दोन्ही कलाकार छोट्या पडद्यावर एकत्र दिसणार असल्याची चर्चा एका फोटोमुळे होत आहे.
अभिनेत्री वर्षा उसगावकर या त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखल्या जातात. बिग बॅासमधील त्यांचा खेळ पाहून चाहते आश्चर्यचकित झाले होते. याशिवाय त्या एका मराठी वाहिनीवरील शिवा या मालिकेतही दिसल्या होत्या. आता पुन्हा एकदा त्या एका नव्या मालिकेत दिसणार आहेत. या मालिकेची पहिली झलक कलर्स मराठी वाहिनीने प्रेक्षकांच्या भेटीला आणली आहे. या मालिकेचं नाव आई तुळजाभवानी आहे.
View this post on Instagram
या मालिकेत काम करणारी अभिनेत्री मृणाल साळूंखे हिने एक पोस्ट केली असून, या पोस्टमध्ये तिने वर्षा उसगांवकर आणि अशोक मामा यांची भेट सेटवर भेट घेतल्याचा फोटो शेअर केला आहे. यामुळे ‘अशोक मा मा’ मालिकेत वर्षा उसगांवकर यांची एन्ट्री होऊ शकते, असं बोललं जात आहे. दोघांनीही एकत्र पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
या प्रोमोत वर्षा उसगावकर यांच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. हिरव्या रंगाची सुंदर नऊवारी साडी नेसून, गोल्डन ज्वेलरी घालून एक अभिनेत्री पाहायला मिळत आहे. तिच्या कातिल अदा चाहत्यांना वेड लावणाऱ्या आहेत. प्रोमोला एक खास कॅप्शन देण्यात आले आहे. “आपल्या सौंदर्याने प्रेक्षकांना घायाळ करणारी, सिनेसृष्टीची ‘सदाबहार अभिनेत्री’ लवकरच तुमच्या भेटीला येतेय! तिला भेटायला तुम्ही तयार आहात ना?” असं कॅप्शन दिलं आहे. या व्हिडीओवर चाहत्यांकडून कमेंटसचा वर्षाव होत आहे.
हेही वाचा : अंधश्रद्धेचा अघोरी खेळ..! भोंदू बाबाचा लघवी पाजण्याचा किळसवाणा प्रकार, अमानुष कृत्याने महाराष्ट्र हादरला





