मुंबई – आपल्या वाहिनीवरून प्रसारित होणाऱ्या रिऍलिटी शो-मधील स्पर्धकाने मराठी भाषेबद्दल गरळ ओकल्याबाबत अखेर कलर्स वाहिनीने माफीनामा सादर केला आहे. बिग-बॉस या रिऍलिटी शो-मधील जान कुमार नामक एका स्पर्धकाने मराठी भाषेचा अवमान करताना, ‘मराठी भाषेची चीड येते’ असं संतापजनक वक्तव्य केलं होत.
जान कुमारच्या या वक्तव्यानंतर मराठी भाषिकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. तसेच मनसे व शिवसेनेने देखील आक्रमक भूमिका घेतली होती.
मराठी जणांमध्ये संतापाची लाट उसळल्याचे लक्षात येताच आता कलर्स वाहिनी ताळ्यावर आली आहे. मराठी भाषिकांच्या भावना दुखावल्याबाबत या वाहिनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आपला माफीनामा सादर केला आहे.
काय म्हंटलं आहे माफीनाम्यात?
कलर्सने घडलेल्या प्रकाराबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे माफीनामा सदर केला आहे. या माफीनाम्यात कलर्सने घडलेल्या प्रकारची माफी मागितली असून विविदित दृश्य काढून टाकत असल्याचं जाहीर केलं आहे. तसेच कलर्स मराठी जणांच्या भावनांचा व मराठी भाषेचा सन्मान ककरत असल्याचाही या माफीनाम्यात उल्लेख आहे.