Ashok Saraf Padmashri : अभिनेते ‘अशोक सराफ’ पद्मश्री पुरस्कारने सन्मानित!

Ashok Saraf Padmashri : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवनात आयोजित नागरी सन्मान सोहळा मध्ये पद्म पुरस्कार २०२५ प्रदान केले. देशातील सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक असलेला पद्म पुरस्कार पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण या तीन श्रेणींमध्ये प्रदान केला जातो.
कला, सामाजिक कार्य, सार्वजनिक व्यवहार, विज्ञान आणि अभियांत्रिकी, व्यापार आणि उद्योग, वैद्यक आणि साहित्य इत्यादी अनेक विषयांमध्ये हे पुरस्कार दिले जातात.
यात, लोकगायिका शारदा सिन्हा यांना कला-लोकसंगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मरणोत्तर पद्मविभूषण प्रदान केले. त्यांच्या मुलाने त्यांच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारला. तसेच मराठी सिनेसृष्टीतील जेष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कारने सन्मानित करण्यात आले.
यावर्षी पद्म पुरस्कारांसाठी १३९ जणांची निवड करण्यात आली आहे. उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री आणि अनेक विशेष पाहुणे या समारंभात उपस्थित होते.
या यादीत ७ पद्मविभूषण, १९ पद्मभूषण आणि ११३ पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. पुरस्कार विजेत्यांपैकी २३ महिला आहेत आणि यादीमध्ये परदेशी/एनआरआय/पीआयओ/ओसीआय श्रेणीतील १० व्यक्ती आणि १३ मरणोत्तर पुरस्कार विजेत्यांचाही समावेश आहे.





