Bigg Boss Marathi । Varsha Usgaonkar : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात वर्षा उसगांवकर त्यांच्या फिटनेसचं आणि सौंदर्याचं रहस्य सांगितलं आहे. आजच्या UNSEEN UNDEKHA मध्ये प्रेक्षकांना हे पाहता येईल. वर्षा ताई कॅप्टन झाल्यामुळे कॅरामल कस्टर्ड बनवून घरातील सदस्यांनी जोरदार सेलिब्रेशन केलं आहे.
वर्षा यांच्या चेहऱ्यावर आजही एक वेगळचं तेज आहे. यामागे नक्की काय रहस्य आहे असा प्रश्न नेहमीच चाहत्यांना पडत असतो. आता बिग बॉस मराठीच्या घरात वर्षा ताईंनी याबद्दल भाष्य केलं आहे.
वर्षा उसगांवकर कॅरामल कस्टर्ड खात कॅमेऱ्यासमोर येऊन म्हणत आहेत,”आमच्याकडे भरपूर दूध, अंडी आणि साखर असल्यामुळे आम्ही घरी कॅरामल कस्टर्ड बनवलं.
View this post on Instagram
जान्हवीने वेळात वेळ काढून हे कॅरामल कस्टर्ड बनवलं आहे. कॅरामल कस्टर्ड खाताना मला खूप छान वाटतंय. आज खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की कॅप्टनसीचं सेलिब्रेशन झालंय”.
कॅरामल कस्टर्ड खात वर्षा पुढे म्हणत आहेत,”आता तुम्हाला कळलचं असेल माझ्या सौंदर्याचं रहस्य. मी सडपातळ असण्याचं रहस्य हेच आहे की मी सगळं खाते. प्राणायाम, योगासनं आणि घरचं जेवण करणं हेच माझ्या सौंदर्याचं रहस्य आहे”.
घरात रंगली घन:श्यामच्या आक्रमकपणावर चर्चा !
आज UNSEEN UNDEKHA मध्ये अंकिता, अभिजीत आणि पॅडी दादा आक्रमक घन:श्यामवर चर्चा करताना दिसत आहेत. पॅडी दादा म्हणत आहेत,”घन:श्यामचं कठीण आहे. त्यांच्या लोकांमध्येही सतत त्याचं वाजत असतं”.
यावर अंकिता म्हणते,”त्याला बोलण्याची शिस्त नाही, तो त्याच्या मतांवर ठाम नाही”. अभिजीत म्हणतो,”घन:श्याम अग्रेसिव्ह आर्या आहे. काही बोलायला गेलो की तो वाकड्यातच जातो. त्याला कॅमेरा पहिला हवा असतो”. त्यावर अंकिता म्हणते,”हुशार आहे तो”.