नाकात नथनी.. गळयात हात ! कपिल शर्मा शोमध्ये वर्षा उसगावकर मराठमोळ्या अंदाज जातात तेव्हा… VIDEO

मुंबई – उर्षा उसगावकर म्हंटल कि आठवतो तो मराठी चित्रपटातील ग्लॅमरस चेहरा. मराठी इंडस्ट्रीमध्ये आपल्या अभिनयाने आणि अदांनी उर्षा उसगावकर यांनी एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. सध्या त्या मोठ्या पडद्यापासून दूर असल्या तरी अनेकदा टिव्हीवरती झळकताना दिसतात. नुकतंच वर्षा यांनी हिंदीतील कॉमेडी स्टार कपिल शर्माच्या शोमध्ये हजेरी लावली.
कॉमेडी स्टार कपिल शर्मा सर्वांना खळखळून हसवण्यासाठी प्रसिद्ध आहे. कपिलच्या शोमध्ये अनेक दिग्गज हजेरी लावतात. कोणी आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी येतो तर कोणी आपल्या कारकिर्दीविषयी गप्पा मारण्यासाठी कपिलच्या शोमध्ये हजेरी लावतो. उर्षा उसगावकर यांनी देखील आपल्या मराठमोळ्या अंदाजात कपिलच्या शोमध्ये एंट्री केली. यावेळी त्यांचा लूक विशेष लक्षवेधी ठरला.
View this post on Instagram
कपिलच्या शोमध्ये ‘राम तेरी गंगा मैली’ फेम मंदाकिनी, अभिनेत्री संगिता बिजलानी आणि मराठी अभिनेत्री वर्षा उसगांवकर आल्या असल्याचे समजते. कपिल शर्माच्या या नवीन एपिसोडचा प्रोमो देखील रिलीज करण्यात आला आहे. यावेळी कपिलने या तिघींचीही फिरकी घेत नेहमीप्रमाणेच धम्माल आणली. हा प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
View this post on Instagram
बॉलिवूडमधील बड्या शोमध्ये गेल्यानंतर देखील वर्षा यांनी आपला मराठमोळा अंदाज सोडला नाही. नाकात नथनी,गळ्यात हार,आकाशी रंगाची पैठणी स्टाईल साडी अशा वेशभूषेत वर्षा उसगावकर यांनी कपिल शर्मा समोर एंट्री केली. या वेळी कपिलसह इतर कलाकारांनी देखील अभिनेत्रींसोबत धमाकेदार कॉमेडी केली.





