‘बबिता जी’ बिग बॅासच्या घरातील सदस्य होणार? अभिनेत्री मुनमुन दत्ताचं नाव आघाडीवर, नवा सिजन असणार खास कारण….

Munmun Dutta : बिग बॅास या लोकप्रिय रियालिटी शोचा १९ वा सिजन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिजनमध्ये टेलिव्हिजन अभिनेत्री मुनमुन दत्ता हे देखील दिसणार असल्याची बातमी समोर आली आहे.
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मध्ये बबिता जीच्या भूमिकेतून मुनमुन घराघरात पोहचली आणि लोकप्रिय बनली. ती आता बिग बॅास या रियालिटी शोमध्ये स्पर्धेक म्हणून सहभागी होणार आहे. नवा सिजन जुलै महिन्यापासून सुरू होणार असल्याची माहिती मिळत आहे. सलमान खान पुन्हा एकदा होस्टिंग करताना पाहायला मिळणार आहे.
दरम्यान, या सिजनमध्ये बिग बॉसच्या घरात कोण कोण सदस्य दिसणार याची चर्चा सुरू झाली आहे. ईटाइम्स’ नुसार, निर्मितीशी संबंधित सूत्रांनी सांगितले की ‘बिग बॉस १९’ च्या निर्मात्यांनी मुनमुन दत्ताशी संपर्क साधला आहे. मात्र, अद्याप काहीही निश्चित झालेले नाही, असे सांगितले जात आहे. यामुळे मुनमुन दत्ता या बिग बॅास या रियालिटी शोची सदस्य होणार का नाही हे लवकरच स्पष्ट होणार आहे.
View this post on Instagram
मुनमुन दत्ताला ‘बबिता जी’ या पात्रामुळे मोठी प्रसिद्ध मिळाली आहे. पण अनेकदा ती वादतही राहिली आहे. ‘बिग बॉस १९’ मध्ये डेझी शाह, ‘बालिका वधू’ फेम जग्या म्हणजेच शशांक व्यास, शरद मल्होत्रा, राम आणि गौतमी कपूर, खुशी दुबे आणि मून बॅनर्जी हे कलाकार सहभागी होणार असल्याची चर्चा आहे. रिपोर्ट्सनुसार, जून महिन्याच्या अखेरीस ‘बिग बॉस १९’ चा प्रोमो शूट केला जाऊ शकतो.





