“याद राखा…आमच्यावर हल्ला कराल तर अमेरिकी सैन्य…” ; इराणच्या धमकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा खामेनींना थेट इशारा

US Threat to Iran। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला कडक इशारा दिला आहे. हा इशारा देताना,”जर इराणने अमेरिकेवर कोणत्याही प्रकारे हल्ला केला तर अमेरिकन सैन्य असे प्रत्युत्तर देईल जे यापूर्वी कोणीही कधीही पाहिले नसेल” असे म्हटले आहे. शनिवारी रात्री इराणवर झालेल्या इस्रायली हल्ल्यात अमेरिकेचा कोणताही हात नव्हता, त्यामुळे अमेरिकेवरील कोणत्याही हल्ल्याचे गंभीर परिणाम इराणला भॊगावे लागतील”, असेही ट्रम्प म्हणाले.
डोनाल्ड ट्रम्प यांनी, “आपण इराण आणि इस्रायलमध्ये सहजपणे करार करू शकतो आणि हा रक्तरंजित संघर्ष संपवू शकतो.”असे म्हटले होते. ट्रम्प यांनी हे विधान त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करताना केले होते. त्यानंतर आता त्यांनी थेट
इस्रायलने पुन्हा मोठी कारवाई केली US Threat to Iran।
शनिवारी रात्री इस्रायलने इराणवर मोठा हवाई हल्ला केला असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा हा इशारा आला आहे. या हल्ल्यात इराणच्या संरक्षण मंत्रालयाचे मुख्यालय, वीज प्रकल्प आणि अणुस्थळांना लक्ष्य करण्यात आले. ‘ऑपरेशन रायझिंग लायन’ अंतर्गत सलग तिसऱ्या रात्री हा हल्ला करण्यात आला आहे.
याशिवाय, इस्रायली डिफेन्स फोर्स (IDF) ने म्हटले आहे की तेहरानमधील ज्या ठिकाणांना इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाशी जोडले गेले होते त्यांना लक्ष्य करण्यात आले. या हल्ल्यांनंतर, जेरुसलेम आणि तेल अवीवमध्ये हवाई हल्ल्याचे सायरन वाजू लागले.
अणु चर्चा रद्द, इराणचा पुन्हा इस्रायलवर हल्ला
ट्रम्प यांच्या वक्तव्याच्या काही तास आधी, इराणने ओमानमध्ये अमेरिकेसोबत नियोजित अणु चर्चा रद्द केली. शुक्रवारी ट्रम्प यांनी इराणला अमेरिकेसोबत त्यांच्या अणुकार्यक्रमाबाबत करार करण्याचे आवाहन केले होते.
दुसरीकडे, इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड्सने दावा केला की त्यांच्या क्षेपणास्त्रांनी आणि ड्रोनने इस्रायलच्या ऊर्जा प्रणालीला आणि लढाऊ विमानांसाठी इंधन तयार करणाऱ्या ठिकाणांना लक्ष्य केले. इस्रायलच्या ताज्या हल्ल्यानंतर हा प्रतिहल्ला करण्यात आला, ज्यामुळे पश्चिम आशियात तणाव आणखी वाढला आहे.
इराणने अमेरिकेला दिला होता इशारा US Threat to Iran।
इस्रायली हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इराणी क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले थांबवण्यासाठी जर त्यांनी कोणतीही मदत केली तर त्यांचे लष्करी तळ आणि जहाजे लक्ष्य केली जातील, असा कडक इशारा इराणने अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्सला दिला आहे. तेहरानच्या अणुकार्यक्रमावरून सुरू असलेल्या रक्तरंजित युद्धाला आणखी तीव्र करण्याचा धोका म्हणून या इशाऱ्याकडे पाहिले जात आहे.





