China-Pakistan : चीन-पाकिस्तानमध्ये अतूट मैत्री.! शी जिनपिंग यांच्याशी शहबाज शरीफ यांची चर्चा
चीनची पाकिस्तानबरोबर अतूट मैत्री असल्याचे चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी म्हटले आहे.

China-Pakistan : चीनची पाकिस्तानबरोबर अतूट मैत्री असल्याचे चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी म्हटले आहे. चीनच्या दौऱ्यावर गेलेले पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी आज जिनपिंग यांची बेट घेतली.
त्यावेळी जिनपिंग यांनी यै मैत्रीचा अभिमानाने उल्लेख खेला आणि पश्चिम आशियामध्ये पुन्हा शांतता प्रस्थापित करण्यासाठी घेतलेल्या पुढाकाबद्दल पाकिस्तानचे कौतुकही केले.
ग्रेट हॉल ऑफ द पीपल्समध्ये झालेल्या बैठकीदरम्यान शी जिनपिंग यांनी शहबाज शरीफ यांचा उल्लेख जूना मित्र असा केला. चीन आणि पाकिस्तान दोन्ही देश दशकांपासून एकमेकांना समजून घेतात, विश्वास ठेवतात आणि मदतही करतात.
दोन्ही देशांमध्ये अतूट पारंपारिक मैत्री आहे, असे जिनपिंग म्हणाल्याचे वृत्त पाकमधील माध्यमांनी प्रसिद्ध केले आहे. इराणमधील वाटाघाटी संपवून पाकिस्तानचे लष्कर प्रमुख फिल्ड मार्शल आसिम मुनीर हे देखील शहबाज शरीफ यांच्या समवेत जिनपिंग यांच्या बेटीसाठी उपस्थित राहिले होते.
अमेरिका-इराणमधील संघर्ष थांबवण्यासाठी पाकिस्तानने केलेल्या मध्यस्थीचे कौतुक केल्याबद्दल शरीफ यांनी समाधान व्यक्त केले. पश्चिम आशियाबाबत अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या चार प्रस्तावामुळे शांतता प्रस्थापित करण्यासाठी मार्गदर्शन मिळाले.
चीन आणि पाकिस्तान या दोन देशांना लोखंडी भाऊ म्हटले असून, दोन्ही देशातील संबंध अतुलनीय असल्याचे देखील शहबाज शरीफ यांनी म्हटले आहे.
यावेळी पाकिस्तान आणि चीनमध्ये शरीफ आणि चीनचे पंतप्रधान ली कियांग यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ पातळीवर चर्चा देखील झाली.
पाकिस्तानच्या विकासाच्या प्राधान्यक्रमांना गती देण्यासाठी आणि परस्पर फायदेशीर सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी चीनची १५ वी पंचवार्षिक योजना आणि उरान पाकिस्तान या पाकिस्तानची विकास चौकटीत समन्वय साधण्याचे महत्त्व शरीफ यांनी अधोरेखित केले.
सीइपीसीच्या पुढच्या टप्प्याचा आढावा
जिनपिंग आणि शहबाज शरीफ यांच्यातील चर्चेदरम्यान चायना-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडोरच्या पुढच्या टप्प्यातील कामाच्या प्रगतीचा आढावाही घेण्यात आला.
तसेच औद्योगिकीकरण, कनेक्टिव्हिटी, कृषी, विज्ञान आणि तंत्रज्ञान, डिजिटल परिवर्तन, स्वच्छ ऊर्जा आणि सामाजिक-आर्थिक विकास यांवर लक्ष केंद्रित करण्यात आले.
पाकिस्तानमधील चीनी व्यक्ती आणि संस्थांची सुरक्षितता आणि प्रकल्पांच्या सुरक्षेप्रती पाकिस्तान कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चारही शरीफ यांनी यावेळी केला.





